लॉकडाउनमध्ये पुण्याला झाला मोठा फायदा; काय ते पहा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

लॉकडाउनच्या काळात शहरातील प्रदूषणात निम्म्याने घट झाल्याचे ‘अर्बन एमिशन’च्या अहवालातून सिद्ध झाले आहे. लॉकडाउन १ ते ४ दरम्यान राज्यासह देशभरातील प्रमुख शहरांतील हवेतील प्रदूषण पातळीची नोंद घेण्यात आली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नाशिक शहरातील प्रदूषण जवळजवळ निम्म्याने घटल्याचे दिसत आहे.

पुणे - लॉकडाउनच्या काळात शहरातील प्रदूषणात निम्म्याने घट झाल्याचे ‘अर्बन एमिशन’च्या अहवालातून सिद्ध झाले आहे. लॉकडाउन १ ते ४ दरम्यान राज्यासह देशभरातील प्रमुख शहरांतील हवेतील प्रदूषण पातळीची नोंद घेण्यात आली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नाशिक शहरातील प्रदूषण जवळजवळ निम्म्याने घटल्याचे दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रदूषणाचे घटलेले हे प्रमाण लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर निश्‍चित वाढेल. अल्पकाळासाठी असलेली ही शुद्ध हवा पुढील काळातही कायम राहावी म्हणून देशभरात विविध उपाययोजनांचे आयोजन करण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘स्वच्छ हवा सर्वांसाठी’ ही मोहिम राबविण्यात आली आहे. 

लॉकडाउननंतरही प्रदूषणातील ही घट कायम राहावी यासाठी पर्यावरण कार्यकर्त्यांच्या वतीने वर्षभर-६० या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरांमध्ये हवेतील पीएम २.५ आकाराच्या प्रदूषकांची पातळी ६० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर एवढी राखली जावी, असे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. यासाठी शहरांमध्ये योग्य त्या उपाययोजना आखण्यात आल्या की नाही, याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी या मोहिमे अंतर्गत करण्यात आली आहे. मोहिमेसाठी #SaalBhar60 या डिजिटल मोहिमेचे आयोजनही पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले होते. राज्यातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून ट्विट करत ऑनलाइन मोहिम हाती घेतली आहे. वातावरण फाउंडेशन, लंग केअर फाउंडेशन आदी पर्यावरणवादी संघटना यात सहभागी झाल्या आहेत. 

- '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

कोरोनाने दाखवून दिले की आपल्याकडेही शुद्ध हवा आहे. प्रदूषित हवा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करते. विविध शहरांमधील प्रदूषित हवेचे वाढते प्रमाण आपल्या मुलांसाठी घातक असून, सर्वांनीच आता स्वच्छ हवेसाठी आग्रही असले पाहिजे. 
- डॉ.अरविंद कुमार, विश्वस्त, लंग केअर फाउंडेशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune got a big advantage in the lockdown pollution Decrease