पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 80.54 इतकी असून, मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. जिल्ह्यातील उर्वरित 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 649 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ हजार 778 जणांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. येत्या सोमवारी (ता. 18) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तालुकानिहाय मतदान टक्केवारी (पुणे जिल्हा) :
तालुका ग्रामपंचायत मतदार संख्या एकूण मतदान टक्केवारी
वेल्हे 20 14802 12832 86.69
भोर 63 66201 56621 85.53
दौंड 49 172370 136685 79.30
पुरंदर 55 105283 87332 82.95
इंदापूर 57 158599 129926 81.92
बारामती49 119457 101110 84.64
जुन्नर 59 119965 91829 76.55
आंबेगाव 25 54045 41567 76.91
खेड 80 125279 102779 82.04
शिरूर 62 167903 138975 82.77
मावळ 49 82519 67464 81.76
मुळशी 36 71310 54385 76.27
हवेली 45 130581 96599 73.98
------- --------- -------------------- ---------- -------------
एकूण 649 1388314 1118104 80.54
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.