
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात मतदान 80.54 टक्के झालेले आहे. जिल्ह्यातील उर्वरित 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
पुणे : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होत असून, अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील, असा अंदाज आहे.
Pune Gram Panchyat Election Result 2021 Live Updates
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
बारामती : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही कायम दिसले.
हवेली तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
- हवेली तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी स्वारगेट गणेश कला क्रीडा मंदिर येथे सुरू आहे. मणेरवाडी ग्रामपंचायत मतमोजणी सुरू आहे.
- हवेली तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल राहटवडे गावात 9 जागांपैकी 9 जागा बिनविरोध झाली 9 पैकी 8 जागेवर महिलांना संधी दिली आहे. एका जागेवर पुरुषाला संधी दिली आहे.
सांगवी सांडस (ता. हवेली) ग्रामपंचायतीत ७ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्व जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर विरोधी विष्णुकृपा ग्रामविकास पॅनेलला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
केसनंद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनेलने निर्वीवाद वर्चस्व मिळवले. तर सत्ताधारी भैरवनाथ पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या.
थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण उर्फ तात्या काकडे यांचे नेतृत्वाखालील चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने दहा जागा जिंकून बाजी मारली आहे. तर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब काकडे व माजी सरपंच नवनाथ काकडे यांच्या नेतृत्वाखाली महातारी आई माता ग्रामविकास पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले
- कुडजे ग्रामपंचायत - 7 जागांसाठी निवडणूक
राष्ट्रवादी काँग्रेस 4
काँग्रेस 3
माजी सरपंच समीर पायगुडे यांच्या पॅनलच्या चार जागेवर विजयी, काँग्रेसचे हर्षल पायगुडे यांच्या पॅनल चे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
-डोणजे गाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेच्या सभापती महिला बाल कल्याणच्या पूजा पारगे यांच्या गावात 11 पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या. एक जागेवर त्यांचा पॅनेलच्या उमेदवार विजयी
- चर्होली खुर्द ग्रामपंचायत दोन जागांचे निकाल जाहीर
रामदास घोलप
शालन पगडे
विजयी झाले आहे.
15 पैकी 13 जागा बिनविरोध
- नायगाव ग्रामपंचायत 11 जागांसाठी निवडणूक
राजेंद्र रतन चौधरी यांच्या पॅनेलचे सात उमेदवार विजयी. याच पॅनेलची एक उमेदवार बिनविरोध. तर विरोधी पॅनेलचा 3 जागा. माजी सरपंच पॅनेलला यांच्या पॅनलला सत्ता.
आणखी वाचा - हवेली तालुक्यातील निकाल
खेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
वराळे ग्रामपंचायत - जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्या भावजयीचा विजय, सरपंच बेबी बुट्टे-पाटील पराभूत तर शरद बुट्टे-पाटील यांची सलग २५ वर्ष सत्ता कायम राखण्यात यश. पंचायतीत सहा विरुद्ध एकने बाजी मारली.
शिवे ग्रामपंचायत - खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या शिवे ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी वर्चस्व मिळवले आहे. पाच विरुद्ध चार अशा फरकाने त्यांनी ग्रामपंचायतीत विजय मिळवला.
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलने हनुमान ग्रामविकास पॅनेलचा ८/१ ने, शिंगवे येथे राष्ट्रवादीच्या श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेलने शिवसेनेच्या भैरवनाथ माता जोगेश्वरी परिवर्तन पॅनेलचा ६/४ ने पराभव केला तर खडकीच्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५/० असा विजय मिळवत बाजी मारली. जवळे( ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ९ जागेसाठी १८ उमेदवार रिंगणात होते यामध्ये स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलचे आठ उमेदवार निवडुन आले तर हनुमान ग्रामविकास पॅनेलचा एकमेव उमेदवार निवडुन आल्याने स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली.
महाळुंगे पडवळ ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली. शिवसेनेला दहा व राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागा मिळाल्या. गेली पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली ग्रामपंचायतीची सत्ता शिवसेनेला खेचून आणण्यात यश आले आहे.
तालुक्यातील निकाल सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
शिरुर तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
- शिरुर तालूका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी शेवटच्या 13 व्या फेरीत आली आहे. विजयी उमेदवार जल्लोष करत आनंद साजरा करत होते. निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. गुलालाची उधळण करत उमेदवारांना खांद्यावर घेतले जात होते.
- मिडगुलवाडी ता. शिरुर ग्रामपंचायत 7 सदस्यसंख्या असणाऱ्या यानिवडणूकीत दोन जागा बिनविरोध तर 5 जागेसाठी निवडणूक लागली होती. या निवडणूकीत सतीष इचके, प्रभावती मिडगुले, निता कोळेकर, संध्या मिडगुले, व राहूल मिडगुले विजयी झाले आहेत.
- कोरेगाव भिमा, केंदूर व मिडगुलवाडी निकाल जाहीर
- सकाळी साडेदहा वाजता दुसरी फैरीत गोलेगाव, वढू बुर्दुक, सणसवाडी, करंदी येथील मतमोजणी सुरू झाली.
- शिंदोडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार १) राखी शिवम वाळुंज. २) सिंधु इंद्रभान ओव्हाळ. ३) अरुण दौलत खेडकर. ४) रेश्मा रविंद्र वाळुंज. ५) कमल भगवंत वाळुंज. ६) संजय गजाबा धुळे. ७) गौतम मारुती गायकवाड.
भोर तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
- भोर तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणी सुरू झाली असून मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी झाली आहे
- नसरापूर ग्रामपंचायतच्या क्रमांक एक व चार प्रभागात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नसरापूर विकास पॅनलचा निर्विवाद जोरदार विजय झाला आहे. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली आहे.
- मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भोर तालुक्यातील दिवळे आणि वेळू गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून विजय उमेदवार निवडण्यात आला. यामध्ये दिवळे गावातून निलेश पांगारे आणि वेळू गावातून सारिका जाधव हे निवडून आले आहेत.
आणखी वाचा - भोर तालुक्यातील निकाल
इंदापूर तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
- निमगाव केतकी ग्रामपंचायत प्रभाग 1 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी. प्रवीण दशरथ डोंगरे, अनुराधा संतोष जगताप, अजित भिवा मिसाळ
- पिंपरी बुद्रुक ( ता इंदापूर ) ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवार पूढील प्रमाणे - वार्ड क्रमांक १) ज्योती श्रीकांत बोडके, भाग्यश्री सुदर्शन बोडके, विद्यादेवी आबासाहेब बोडके, वार्ड क्रमांक २) पांडुरंग हंबिरराव बोडके, अनुराधा बाबासाहेब गायकवाड, सुनिता दत्तात्रय शेंडगे, वार्ड क्रमांक ३) संतोष हरिभाऊ सुतार, अनिल मशिकांत पाटील, हलीमा साहेबलाल शेख. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पिरसाहेब ग्रामविकास पॅनल सात तर भाजप पुरस्कृत पिरसाहेब विकास पॅनलला दोन जागावर समाधान मानावे लागले. मात्र तिसऱ्या आघाडीला खातेही खोलता आले नाही.
आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी
पुरंदर तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
परिंचे ग्रामपंचायत १० जागांसाठी निवडणूक शिवसेना ७ राष्ट्रवादी ३ बिनविरोध १ माजी सभापती अर्चना जाधव यांच्या पॅनलचा ७ जागांवर विजय युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांच्या पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले.आणखी वाचा - पुरंदर तालुक्यातील निकाल
जुन्नर तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
ग्रामपंचायत हिवरे तर्फे ना.गाव (ता.जुन्नर) ग्रामपंचायत : विजयी उमेदवार :मनिष सुनील मोरडे ,योगीता दत्ता खोकराळे ,अर्चना गणपत भोर,दिगंबर राजेंद्र भोर,
अनिता सुरेश थोरात,स्वाती विशाल खोकराळे ,सोमेश्वर जालिंदर सोनवणे
छाया शांताराम खोकराळे,दयानंद शंकर मुळे,अलका प्रदीप चक्कर पाटील
मुळशी तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
-चाले (ता.मुळशी) ग्रामपंचायत निवडणुकीत दोघीना समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात सीमा दहीभाते यांचे नशीब उजळले. या ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये रंजना अशोक दहीभाते आणि सीमा श्रीरंग दहीभाते या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. दोघीँनी मतदारापर्यंत पोचत कसून प्रचार केला. दोघींसाठीही माहेर आणि सासरकडील नातेवाईकही पळाले. त्यामुळे दोघीत कोण विजयी होणार याची ग्रामस्थांना उत्सुकता होती. तथापि मतमोजणीत दोघींनाही समसमान 176 मते मिळाली.
आणखी वाचा - मुळशी तालुक्यातील निकाल
दौंड तालुका ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल
नानगाव ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले असून भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत विकास व संदीप खळदकर या सख्ख्या भावांचा विजय झाला आहे.
विजयी उमेदवार : संदिप खळदकर,आशा गुंड,
भाग्यश्री खळदकर,विमल खळदकर,विष्णू खराडे,चंद्रकांत खळदकर
शितल शिंदे,मीना काळे,सचिन शेलार,गणेश खराडे,विकास खळदकर,
स्वप्नाली शेलार,स्वाती आढागळे.
- वरवंड ग्रामपंचायत 17 जागांसाठी निवडणूक
-राष्ट्रवादीचे श्री.गोपीनाथ महाराज आदर्श ग्रामविकास पॅनेलचे 12 तर विरोधी श्री.गोपीनाथ महाराज जनसेवा पॅनेलचे 5 उमेदवार विजयी.
Daund Election Result 2021:दौंडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; भाजपच्या हाती मोजक्या ग्रामपंचायती
तालुकानिहाय झालेले मतदान टक्केवारी (पुणे जिल्हा) :
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात मतदान 80.54 टक्के झालेले आहे. जिल्ह्यातील उर्वरित 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 649 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी 21 हजार 359 उमेदवारांनी एकूण 21 हजार 771 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ हजार 778 जणांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. सोमवारी (ता. 18) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरुवात झाली. अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.