esakal | पुणे : पोलीस ठाण्यात यापुढे दर १५ दिवसांनी तक्रार निवारण दिन
sakal

बोलून बातमी शोधा

police

पुणे : पोलीस ठाण्यात यापुढे दर १५ दिवसांनी तक्रार निवारण दिन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात यापुढे १५ दिवसांनी तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे. पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून ज्या दिवशी तक्रार दाखल होते त्याच दिवशी तक्रारीचे निवारण करण्याची सूचना संबंधित बीट अंमलदार व पोलीस ठाण्याच्या प्रमुखास केली जाणार आहे. सर्वसामान्याची तक्रारी सोडविण्यासाठी या तक्रार निवारण शिबिराचा भविष्यात उपयोग होणार आहे .असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे डॉ. देशमुख स्वत उपस्थित राहून येथील तक्रारींचे निरसन केले. यावेळी घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, माजी सभापती कैलासबुवा काळे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, सरपंच क्रांती गाढवे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा रत्ना गाडे, अड संजय आर्वीकर, अॅड. गायत्री काळे, स्वप्ना काळे, सखाराम काळे, सुनिल इंदोरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, २०१४ साली शासनाचे जीआर काढून तक्रार निवारण शिबिर घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पहिल्यांदा हे शिबिर होत आहे. कोविडच्या काळात अनेक केसेस पेंडीग होत्या. त्याला गती देण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले आहे. तक्रारींचे निवारण यापुढे प्रत्येक 15 दिवसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात केले जाईल. यावेळी डॉ. देशमुख यांनी पोलीस ठाण्याची पाहणी केली. १५ वर्षापूर्वी हरवलेल्या तरूणाच्या मिसींग केसबाबत स्वत माहिती घेऊन त्या व्यक्तीला काही सूचना केल्या. बीट अंमलदार यांना कशाप्रकारे शोध घ्यावा याबाबत सूचना केली.

यावेळी जीवन माने म्हणाले, आज ६६ नव्याने तक्रार अर्ज आले आहेत. २५ मयत व्यक्तींचा निर्णय घेणे, ६ मुद्दे माल परत करणे, ९ जणांना गुन्ह्यांची माहिती देण्यात आली, ४५ मिसींग केसपैकी ६ जणांचा ट्रेस लागला आहे. यावेळी कैलासबुवा काळे, देविदास दरेकर, स्वप्ना काळे, क्रांती गाढवे, अॅड संजय आर्वीकर यांनी सूचना केल्या. तसेच गणेश कसबे यांनी आदिवासी भागातील नागरिकांना घोडेगावमध्ये आल्यानंतर दिवसभर बसून ठेवले जाते. त्यांना 60 किलोमीटरवरून यावे लागते. बीट अंमलदार व पोलीस दिवसा मद्य पितात यावर अंकुश ठेवावे अशी मागणी केली.

loading image
go to top