Pune News : कार रॅलीत स्टेअरिंग खराब होऊनही निकिता तिसऱ्या क्रमांकाने विजय

अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत स्टेअरिंग खराब होऊन व चावी तुटूनही माघार न घेता निकिता टकले - खडसरे यांनी उत्तम परफॉर्मन्स दाखवत तिसरा क्रमांक पटकाविला.
car rally
car rallysakal

हडपसर (Pune News) - कार रॅलीने नुकताच या वर्षी पार पडला . अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत स्टेअरिंग खराब होऊन व चावी तुटूनही माघार न घेता येथील निकिता टकले - खडसरे ने चांगला परफॉर्मन्स दाखवत तिसरा क्रमांक पटकाविला. रॅलीचे आयोजन नागालँड ऍडव्हेंचर क्लबने केले होते.

नागालँडमध्ये अनुभवी चालक चेतन शिवरामने पहिला क्रमांक पटकावला आणि तो इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप-२ श्रेणीतील एकूण रॅलीत दुसरा सर्वोत्तम ठरला. कोहिमा येथे अर्णव प्रताप सिंग अव्वल ठरला. ज्युनिअर इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप श्रेणीत त्याने पोडियम आणि दुसरा क्रमांक पटकावला.

तर निकिता टक्कले खडसरेने यांनी तिसरा क्रमांक पटकावला.नागालँड कोहिमा येथे झालेल्या रॅलीत स्पर्धेकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, यामध्ये कडाक्याची थंडी, इंजिन समस्यांमुळे गाड्या सुरु झाल्या नाहीत, धुके असल्याने वाहने धडकली.

पहिल्याच दिवशी दहा स्पर्धक रॅलीतून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस स्पर्धक सहभागी झाले होते. या रॅलीत भारतातून सुमारे सत्तर कार रॅली स्पर्धक सहभागी झाले होते.

निकिताने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षापासून कार रॅलीमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच भारतात झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये अनुभवी स्पर्धक सहभागी असताना नवख्या निकिताने प्रत्येक स्पर्धेत आपली चमक दाखवली.

तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. निकिताच्या या यशाचे श्रेय ती वडील उद्योजक नितीन टकले, पती शुभम खडसरे, कुटुंबीय व तिचे मार्गदर्शक चेतन शिवराम यांना देते.

यावर्षी निकिता इंडियन नॅशनल आटो क्रॉस चॅम्पियनशिप सहा ते सात रॅली मध्ये सहभागी होणार आहे. आगामी स्पर्धेत भारत व परदेशात होणाऱ्या रॅलीत यश मिळविण्याचा संकल्प निकिताने व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com