हडपसर-मांजरीकरांनी वैष्णव सोहळ्याप्रती विविध उपक्रमातून व्यक्त केला सेवाभाव

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
Pune Hadapsar Manjari ashadhi wari Ceremony ncp leaders
Pune Hadapsar Manjari ashadhi wari Ceremony ncp leaderssakal

हडपसर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हडपसर-मांजरी परिसरातून उत्साहात मार्गस्थ झाला. यावेळी येथील भाविक व नागरिकांनी हरिनामाचा जयघोष करीत विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करून वारकऱ्यांना फराळाचे वाटप केले. आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. पक्षाचे मतदारसंघाचे अध्यक्ष शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, उद्योजक राहुल तुपे, बाळासाहेब तुपे, घन:श्याम जगताप, सनी तुपे आदी यावेळी उपस्थित होते.

सातववाडी-गोंधळेनगर येथील स्वाभिमानी महिला संस्था व युवक प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने संतांच्या जीवंत देखाव्याने पालखी सोहळ्याचे स्वागत केले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या या देखाव्याचे वारकरी व नागरिक बंधू-भगिनींनी कौतुक केले. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे तसेच प्रशांत सुरसे, सचिन निमकर, उल्हास भोंगळे, हरीश शेलार, विरनाथ सरडे, राजेश महामुंकर, मनोज पोटे, श्रीकांत कळसकर, युवक प्रतिष्ठान, स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे संयोजन केले.

हडपसर मेडिकल असोसिएशनने आरोग्य दिंडीचे आयोजन केले होते. "मन आणि मनाच्या व्याधी' हा विषय घेऊन दिंडीने नागरिकांचे प्रबोधन केले. सुमारे १०० डॉक्टर या दिंडीत सहभागी झाले होते. घोषवाक्याचे फलक मिरवीत गाडीतळ परिसरात ही दिंडी काढली होती. आबणे हॉस्पिटलपासून दिंडीला सुरूवात झाली. सामाजिक आरोग्यासाठी झटणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी डॉक्टरांनी दिल्या शुभेच्छा. येथील सूर्यवंशी दाम्पत्याकडून पालखी सोहळ्यातील दिंडीला पाण्याची टाकी भेट देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या अश्विनी व योगेश सूर्यवंशी यांनी त्यासाठी योगदान दिले.

मांजरी येथील अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने संत तुकाराम पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची हातापायाची मॉलिश करुन सेवा करण्यात आली. मॉलीशमुळे थकवा गेल्याने वारकरी बंधू भगिनिंनी आनंद व्यक्त केला. संस्थचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, माजी उपसरपंच प्रमोद कोद्रे, बबनराव जगताप, पंडित जगताप, प्रदीप कोद्रे, शाम शेटे, बाबा मोरे, राम पामने, अतुल रासकर यांनी संयोजन केले.

पुणे युथ फैडेशनच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. सामाजीक कार्यकर्ते नितीन टकले, निकिता टकले, संस्था संस्थापक इसाक शेख तसेच, नितीन गायकवाड, रमेश काळे, सुरज राखपसरे, भुषण बराहडीया आदी यावेळी उपस्थित होते.

सातववाडी बनकर कॉलनी येथे स्व. अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने फराळाचे वाटप केले. बाबासाहेब बनकर, महेश बनकर, निलेश बनकर, रूपेश बनकर, उमेश बनकर, राकेश बनकर, रूषीद बनकर, ओंकार बनकर, प्रमोद गोंधळे, प्रसाद गोंधळे, ज्ञानदा बनकर, अश्विनी बनकर, मनिषा गोंधळे यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा केली. प्रतिष्ठानच्या जयश्री बनकर व शिवसेना उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनी संयोजन केले.

तुषार घुले व माजी उपसरपंच अमित घुले युवा मंच व शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील २२७ वारकऱ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. वारकऱ्यांना यावेळी कोविड लसीकरण सर्टिफिकेटही देण्यात आली. सुमारे ३००० वारकऱ्यांना विविध आजारांवरील गोळ्या औषधांचे मोफत वाटपही यावेळी करण्यात आले.

तसेच श्री पांडुरंग ग्रामविकास दिंडीसाठी हडपसर ते पंढरपूर टँकरद्वारे पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली. साहित्य सम्राट संस्थेच्या वतीने हडपसर रामटेकडी येथील एस आर पी ग्रुप नंबर २ येथील शिव मंदिरात दिंडीतील वारकऱ्यांसाठी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात दिंडी प्रमुख ह.भ.प.अशोक महाराज गवळी, एसआरपी ग्रुप २ चे अधिकारी आणि युनिटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सीताराम नरके, विनोद ताम्हाणे, नानाभाऊ माळी, ऍड. उमाकांत आदमाणे, बा. ह. मगदूम, कांचन मुन, सुरेश धोत्रे, आनंद गायकवाड, किशोर टिळेकर, विनोद अष्टुळ आणि अशोक शिंदे यांनी संमेलनात कविता सादर केल्या. यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदार संघ व अखिल उन्नती नगर मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी फराळ व २००० अत्यावश्यक किटचे वाटप करण्यात आले. हडपसर विधानसभा भाजप उपाध्यक्ष युवराज मोहरे, माऊली महामुनी, मनोज पन्हाळे, मामा बारस्कर, गणेश कोरडे, सचिन पन्हाळे, बाबू भालदार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणीकाळभोरकडे मार्गस्थ झाल्यावर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर महामार्गाची स्वच्छता केली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची शेवाळेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेवाळे यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. लोटस व योग हॉस्पिटल तसेच डॉ. सुप्रिया कोद्रे व डॉ. कृष्णाली भालेराव यांच्या पथकाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. रूग्ण वारकऱ्यांवर यावेळी औषधोपचार करण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन पालखी मार्गाची स्वच्छता केली. या निमित्ताने परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला.

भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फौंडेशनकडूनही वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. स्मितसेवा फौंडेशनच्या स्मिता गायकवाड, तुषार गायकवाड, डॉ. अशोक सोरगाविकर, राहुल भुजबळ, काशिनाथ भुजबळ, संगीता पाटील, मीना पिंटो, अर्चना काटे, मोहिनी शिंदे, अंजली सोहा, आशा भूमकर, मोनाली हिंगणे, सुनीता रायकर, माधवी पूजारी, राजश्री गोंदाने, पूनम फरांदे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com