Pune : पुणे- नगर महामार्गावर वाघोलीत अतिक्रमणावर हातोडा, अधिकारी कारवाईवर ठाम

तो मोकळाच राहील याची खबरदारी महापालिकेने घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.महापालिका सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.
wagholi
wagholisakal

वाघोली - पुणे नगर - महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाघोलीत मंगळवारी महामार्गाच्या दुभाजकापासून 15 मीटर मधील अनेक अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्त पणे ही कारवाई केली. काही पक्की बांधकामे, पत्र्याचे शेड, ओटे, बोर्ड, स्टाँल्स आदींवर ही कारवाई करण्यात आली. यासाठी मोठा फौजफाटा होता. महामार्गाच्या दुभाजकापासून 15 मीटर मोजून कारवाई करण्यात येत होती.

ज्यांची पक्की बांधकामे होती त्यांना 15 दिवसांपूर्वी नोटिस बजविण्यात आली होती. यामुळे काही व्यावसायिकांनी जो भाग 15 मीटर मध्ये येतो तो खाली केला होता. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले. कारवाईत सातत्य ठेवून जो भाग मोकळा केला आहे.

तो मोकळाच राहील याची खबरदारी महापालिकेने घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.महापालिका सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.

wagholi
Pune : संशयित कारमधून साडेतीन कोटींची रोकड जप्त,पुणे पोलिसांची कारवाई

दोन कारवाई कडे सर्वांचे लक्ष

पुणे नगर महामार्गालगत एका नेत्याचे कार्यालय तसेच चार गाळे आहेत. तर एका नेत्याशी संबंधीत काही फूड स्टाँल्स 15 मीटर मध्ये होते. या दोन वर कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष होते. एका नेत्याने अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. दोन्ही अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

wagholi
Mumbai : माहुल मधील एमएमआरडीए वसाहतीत रहिवाशांचा जीव टांगणीला

शासकीय जागेवर कमाई

वाघोलीत शासकीय व अन्य जागेवर फूड, फळे व इतर स्टाँल्स आहेत. या स्टाँल्स कडून काही स्थानिक जागेशी संबंध नसताना भाडे वसूल करून कमाई करीत होते. यातील काही स्टाँल्सवर कारवाई झाल्याने त्यांची कमाई बंद झाली आहे.

फुटपाथ तोडून तातडीने लेन बनविणे गरजेचे

वाहतुक कोंडी होऊ नये या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. मात्र जो भाग कारवाईत मोकळा झाला तेथील फुटपाथ तातडीने तोडून तेथे वाहतुकीसाठी लेन उपलब्ध करून दिली तरच कारवाईचा उपयोग होईल. अन्यथा पुन्हा अतिक्रमण ठरलेली. व पुन्हा तोच पाढा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com