पुणे : ‘हायजिआ’मुळे होणार घनकचऱ्यास प्रतिबंध

सांडपाण्यातून नदीमध्ये जाणाऱ्‍या घनकचऱ्‍याला प्रतिबंध करण्यासाठी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने, इमरिस, पर्सिस्टंट सिस्टीम, पुणे महानगरपालिका आणि वर्टेक्स प्रा. लि.च्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे.
Hygia Project
Hygia ProjectSakal
Summary

सांडपाण्यातून नदीमध्ये जाणाऱ्‍या घनकचऱ्‍याला प्रतिबंध करण्यासाठी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने, इमरिस, पर्सिस्टंट सिस्टीम, पुणे महानगरपालिका आणि वर्टेक्स प्रा. लि.च्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे.

पुणे - सांडपाण्यातून (Drainage Water) नदीमध्ये (River) जाणाऱ्‍या घनकचऱ्‍याला (Solid Garbage) प्रतिबंध (Restrictions) करण्यासाठी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने, इमरिस, पर्सिस्टंट सिस्टीम, पुणे महानगरपालिका (Pune Municipal) आणि वर्टेक्स प्रा. लि. च्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर ‘हायजिआ’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत २०० किलोहून अधिक घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून यशस्वीरीत्या प्रतिबंधित करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली आहे.

याबाबत फाउंडेशनचे कार्यकारी संचालक तन्वीर इनामदार म्हणाले, ‘दरवर्षी पुण्यामध्ये सखल भागात मुसळधार पाऊस येतो. दरम्यान सांडपाणी वाहिनी मध्ये मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या घनकचऱ्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. शहरांमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबून पूर येऊ नये तसेच घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी ‘हायजिआ’ प्रकल्प करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया येथील क्विनाना या शहराने सांडपाणी वाहिनीमधून कचऱ्याचा योग्य निचरा होण्यासाठी एक सोपा आणि किफायतशीर उपाय तयार केला आहे. त्याच धर्तीवर आधारित एक प्रकल्प पुण्यामध्ये करण्यात आला आहे. ‘हायजिया’ प्रकल्पाद्वारे मुळा आणि मुठा नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण आणले जाणार आहे. सध्या ओंकारेश्वर पूल आणि हडपसरच्या वैदूवाडी झोपडपट्टी परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प उभारण्यात आला आहे.’

नदीत जाण्यापासून पाच टन घनकचरा रोखला

‘हायजिआ’ प्रकल्पामुळे २० ते ३० टक्के घनकचरा नदीत जाण्यापासून रोखला जात असून पावसाळ्यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्‍या सांडपाणी वाहिनीवर हे जाळीदार आवरण वापरण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्याच्या ४ महिन्यांत कमीतकमी ५ टन घनकचरा नदीत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे तन्वीर इनामदार यांनी सांगितले.

स्वच्छ नदी करण्यासाठी समाज आणि प्रशासनाचा एकत्रित प्रयत्न असायला हवा. गेल्या अनेक वर्षांमध्ये नद्यांच्या घनकचरा प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. सांडपाण्याच्या वाहिन्या आणि कालवे गुदमरल्याने पुराच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागले आहे. हायजिआ प्रकल्पामुळे नदी प्रदूषणाला कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकल्पात सहभागी होताना आनंद होत आहे.

- सोनाली देशपांडे, अध्यक्षा-पर्सिस्टंट फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com