Pune Rains:पुणेकरांनो मार्ग बदला; वाचा पावसामुळे कोठे आहे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

बोपोडी, खडकी, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, औंध बाणेर रस्ता, येरवडा, नगर रस्ता, विमाननगर, सेनापती बापट रस्ता, कोथरुड, वानवडी, हडपसर, पुणे स्टेशन या परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. 

पुणे : शहराच्या उपनगरांमध्ये मंगळवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे नागरीकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. विशेषतः नगर रस्ता, सोलापुर रस्ता, खडकी-बोपोडी या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. 

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याची चिन्हे आहेत. विशेषतः दररोज सायंकाळी किंवा रात्रीच्या सुमारास पाऊस होत असल्यामुळे नागरीकांना दोन ते तीन तास वाहतुक कोंडीमध्ये काढावी लागत असल्याचे वास्तव आहे. सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने शहराला झोडपले. त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. दिवाळीची खरेदी करुन घरी परतणाऱ्या नागरीकांना पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतुक कोंडीमध्ये अडकावे लागले. 

पुणेकरांनो सावधान आज रात्री मुसळधार पावसाचा अंदाज

मंगळवारी सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतुक संथगतीने सुरू होती. तर उपनगरांमध्ये मात्र, ठिकठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण झाल्याची स्थिती होती. मध्यरात्री व पहाटे झालेल्या पावसामध्ये रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आल्याने त्यामध्ये खासगी दुचाकी, कारसह खासगी बसही अडकून पडल्या. तर सायंकाळच्या पावसानेही नागरीकांची तारांबळ उडाली.बोपोडी, खडकी, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, औंध बाणेर रस्ता, येरवडा, नगर रस्ता, विमाननगर, सेनापती बापट रस्ता, कोथरुड, वानवडी, हडपसर, पुणे स्टेशन या परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. 

पुणेकरांनो सावधान आज रात्री मुसळधार पावसाचा अंदाज

कोठे काय घडले?
लोहगाव येथील जकात नाक्‍याजवळ खासगी कंपनीची बस पाण्यामध्ये अडकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बसमधील 23 जणांची रश्‍शीच्या सहाय्याने सुटका केली. अग्निशामक दलाचे जवान रघुनाथ भोईर, महेश मुळीक, उमेश डगळे, विलीन रावतु, सोपान पवार यांनी नागरीकांना सुखरुप बाहेर काढले. 

या ठिकाणी झाली वाहतुक कोंडी 

 1. बोपोडी
 2. खडकी
 3. शिवाजीनगर
 4. गणेशखिंड रस्ता
 5. औंध
 6. चतुःश्रृंगी
 7. कर्वेनगर
 8. कोथरुड
 9. येरवडा
 10. विमाननगर
 11. हडपसर
 12. सिहंगड रोड
 13. वानवडी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune heavy rain traffic jam on several routes updates