पुणे : 'विज्ञान' दिनी विद्यापीठाचा हेरिटेज वॉक

1puneuniversity_6.jpg
1puneuniversity_6.jpg

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनी आज(ता.२८) विद्यापीठातील भुयारी मार्ग-संग्रहालय यांचा समावेश असलेला हेरिटेज वॉक, सायन्स पार्कमधील विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, मानवशास्त्र विभागातील संग्रहालय पाहण्याची संधी मिळणार आहे. या तिन्ही गोष्टी आज सकाळी ११ ते सायं. ५ या वेळात सर्वांसाठी विनामूल्य खुल्या असणार आहेत.

हेरिटेज वॉक
हेरिटेज वॉक (वारसा दर्शन) या उपक्रमांतर्गत विद्यापीठात असलेला दीडशे वर्षांपूर्वीचा भुयारी मार्ग, नव्याने विकसित केलेले संग्रहालय आणि मुख्य इमारतीचा भाग दाखविण्यात येतो. हा उपक्रम आज रोजी खुला राहणार आहे. त्यासाठी इच्छुक नागरिकांनी विद्यापीठ आवारातील इलिस गार्डनसमोर असलेल्या पोतदार संकुलात यावयाचे आहे.

सायन्स पार्क
याच दिवशी विद्यापीठातील सायन्स पार्कमध्ये विज्ञानातील १०० हून अधिक प्रयोगांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तेही ११ ते ५ या वेळेत खुले राहणार आहे. सायन्स पार्क हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील पर्यावरण शास्त्र विभागात आहे.

मानवशास्त्र  संग्रहालय
विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातील संग्रहालयही विज्ञानदिनी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत खुले राहणार आहे. मानवशास्त्र विभाग विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com