पुणे : सणसवाडीत सिंटेक्स कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग; जिवीतहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

आज (ता.२०) सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर सणसवाडी हद्दीतील एल अॅन्ड टी फाट्यावरील प्लॅस्टीक टाक्या बनविणाऱ्या सिंटेक्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागली.

शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्लॅस्टिकच्या टाक्या बनविणाऱ्या सिंटेक्स कंपनीच्या गोडाऊनला आज सकाळी साडेदहाच्या सुमारा आग लागली. मोठ्या प्रमाणात कच्चा माल आगीच्या भक्षस्थानी पडल्याची माहिती कंपनीच्या काही कामगारांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नसून आग आटोक्यात येत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. 

     
आज (ता.२०) सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर सणसवाडी हद्दीतील एल अॅन्ड टी फाट्यावरील प्लॅस्टीक टाक्या बनविणाऱ्या सिंटेक्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागली. संपूर्ण प्लॅस्टीक कच्चा माल असल्याने धुराचे प्रचंड लोट सणसवाडी-शिक्रापूर परिसरात दिसत असून आग शमविण्यासाठी रांजणगाव एमआयडीसीतील टँकर घटनास्थळी वेळेत पोहचल्याने आग नियंत्रणात येत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. दरम्यान आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune A huge fire broke out at cintex godown in Sanaswadi