पुणे : 'पीएमआरडीए'मार्फत अनधिकृत बांधकाम उध्वस्त

सव्वा तीन हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पोकलेनच्या मदतीने पाडण्यात आले.
PMRDA
PMRDASakal

पुणे : मुळशी तालुक्यातील नेरे येथील अनधिकृत बांधकाम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत मंगळवारी (ता. ८) पाडण्यात आले.

नेरे येथील सहा हजार तीनशे चौरस फुटांचे आणि दत्तवाडी येथील सुमारे सव्वा तीन हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पोकलेनच्या मदतीने पाडण्यात आले. कारवाईदरम्यान ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

‘पीएमआरडीए’च्या हद्दीत कार्यालयीन परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये. तसेच, अनधिकृत बांधकामधारकांकडून कारवाईचा संपूर्ण खर्च वसूल करण्यात येईल, असा इशारा ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com