पुणे : माळेगावात इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : माळेगावात इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीला

पुणे : माळेगावात इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीला

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव (पुणे) ः बारामती तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक २०२१ तयारीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या अधिपत्याखाली आज १७ प्रभागामधील आरक्षण सोडत व प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला. निवडणूक आयोगाने दिलेल्या कृती आराखरड्यानुसार एक सदस्यीय प्रभागाची अंमलबजावणी होताना दिसून आली. यामध्ये ८ पुरुष व ९ महिलांना काम करण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः जाहिर झालेले आरक्षण व प्रभाग रचना मनासाखरी झाली नसल्याने बहुतांशी इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.

दरम्यान, प्रभागनिहाय आरक्षण सोडत, कंसात लोखसंख्या व प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा पुढील प्रमाणे ः प्रभाग १ ः ओबीसी महिला (१३१०) रचना- उत्तर दगडी खाण, पुर्व सलोबाचा ओढा, दक्षिण नंदन डेअरी-पाणी फिल्चर रस्ता, पश्चिम पणदरे व सोनकसवाडी ग्रामपंचायत हद्द. प्रभाग २ः सर्वसाधारण (१३३०) रचना- उत्तर खूंटाळेवस्ती, पुर्व जाधवराव राजवाडा रोड, दक्षिण क्रीडा संकूल संरक्षण भिंत, प्रश्चिम मुथा पेट्रोल पंप. प्रभाग ३ः सर्वसाधारण (१२८२) , रचना- उत्तर माळेगाव खुर्द हद्द ओढा, पुर्व निरा-बारामती रोड स्मशानभूमी, दक्षिण एसएसएम हायस्कूल मागिल बाजू, पश्चिम क्रीडा संकूल कंपाऊंड. प्रभाग ४ ः ओबिसी महिला (१११२) , रचना- नीरा बारामती रोड, पुर्व झैलसिंग रोड, दक्षिण दत्त चौक-पालखी मार्ग, पश्चिम मेनपेठ रोड. प्रभाग ५ः सर्वसाधारण महिला (१३६८), रचना- उत्तर एसएसएम हायस्कूल, पुर्व माधवानंद टाॅकीज समोरून जाणारा रस्ता, दक्षिण न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल, प्रश्चिम प्राथमिक आरोग्य केंद्र. प्रभाग ६ ः अनुसुचित जाती (१२५०), रचना- उत्तर दत्त चौक पालखी मार्ग, पुर्व झेलसिंग रोड, दक्षिण २२ फटा, पश्चिम न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल. प्रभाग ७ ः अनुसुचित जाती महिला (१२००), रचना- उत्तर हरिभाऊ तावरे वस्ती, पुर्व एरिगेशन चारी, दक्षिण संभाजीनगर गायकवाड वस्ती रस्ता, पश्चिम पिर दर्गा. प्रभाग ८ ः सर्वसाधारण महिला (११२५), रचना-उत्तर नीरा-बारामती रोड, पुर्व बारामती-माळेगाव शिव,दक्षिण लाखे गोठा, पश्चिम झैलसिंग रोड. प्रभाग ९ ः ओबीसी पुरूष (११२९), रचना- उत्तर संभाजीनगर गायकवाड वस्ती रस्ता, पुर्व शारदानगर आंदोबावाडी रोड, दक्षिण पाहुणेवाडी रस्ता, पश्चिम शिरवली रोड. प्रभाग १०ः सर्वसाधारण महिला (११९०),रचना- उत्तर न्यू इंग्लिश मेडीय़म स्कूल, पुर्व २२ फाटा, दक्षिण-शारदाबाई पवार विद्यालय, पश्चिम एरिगेशन चारी. प्रभाग ११ः सर्वसाधारण महिला (१२०५), रचना- उत्तर नंदन डेअरी, पुर्व-दफण भूमी, दक्षिण २२ फाटा, पश्चिम नागतळे. प्रभाग १२ ः सर्वसाधारण (१३५३), रचना-उत्तर दगडी खाण, पुर्व इंजिनिअरिंग काॅलेज शेजारील खाणीकडे जाणारा रस्ता, दक्षिण रमा माता नगर, पश्चिम पणदरे-माळेगाव रस्ता. प्रभाग १३ः सर्वसाधारण (१२५०), रचना- उत्तर रमामाता नगर, पुर्व नागतळे, दक्षिण गोफणेवस्ती, पश्चिम पणदरे माळेगाव शिव. प्रभाग १४ः ओबीसी महिला (१३५०), रचना- उत्तर २२ फाटा, पुर्व माळेगाव शिरवली रोड, दक्षिण बर्गे हाॅस्पीलट ते तावरेवस्ती रस्ता, पश्चिम लोणकरवस्ती. प्रभाग १५ ः ओबीसी पुरुष ( १२८६), रचना-उत्तर बर्गे हाॅस्पीटल ते तावरेवस्ती रस्ता, पुर्व २२ फटा, दक्षिण-बुरूंगलेवस्ती प्राथमिक शाळा, प्रश्चिम माळेगाव शिरवली रोड. प्रभाग १६ः सर्वसाधारण (१३२०), रचना- उत्तर वाघमोडे कोळेकरवस्ती रस्ता, पुर्व येळेवस्ती रस्ता, दक्षिण येळे वस्ती, पश्चिम नाळे-नलवडेवस्ती. प्रभाग १७ः सर्वसाधारण महिला (१३९७), रचना-उत्तर गोफणेवस्ती, पुर्व माळेगाव शिरवली रोड, दक्षिण शिरवली शिव, पश्चिम धुमाळवाडी शिव.

हेही वाचा: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

हारकत व सुनावणीचे वेळापत्रक ः

माळेगाव नगरपंचायतीची लोकसंख्या २१ हजार २८४ इतकी आहे. त्यानुसार या नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने जाहिर झालेली प्रभागनिहाय आरक्षण सोडत व प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्याबाबत हारकती व सूचनांसाठी १६ नोव्हेंबर पर्यंत कालावधी दिला आहे, तर त्यावर १७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून २३ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय जाहिर केला जाणार आहे.

loading image
go to top