पुणे-इंदूर एसटी बस आजपासून सुरू

ST
ST

पुणे - राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) पुणे ते इंदूर ही आंतरराज्य बससेवा सोमवारपासून (ता. ८) शिवाजीनगर स्थानकातून सुरू होत आहे. ही सेवा एक महिन्यापूर्वी पिंपरी- चिंचवड स्थानकातून सुरू करण्यात आली होती. गाडी वेळेत पोचत नसल्याने स्थानक बदलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ही बस शिवाजीनगर स्थानकातून रोज सकाळी सहाला सुटणार असून, मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पोचणार आहे, तर परतीच्या प्रवासाची हीच वेळ असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रवासाची बस परिवर्तन (लाल एसटी) असून त्याचा तिकीट दर प्रतिप्रवासी ७३५ रुपये असेल. संगमनेर, शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, महू मार्गे इंदूर असा बसचा मार्ग असेल. बसचे आरक्षण सुरू झाले असून, अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे- इंदूर ही बस सेवा मागील महिन्यात पिंपरी- चिंचवड येथून सुरू केली होती. मात्र बस वेळेत धावत नसल्याने, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी ही बस उद्यापासून (ता. ८) शिवाजीनगर स्थानकातून चालवण्यात येणार आहे.
- यामिनी जोशी, विभागीय व्यवस्थापक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com