Pune : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास शहा यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur former president Education Broadcasting Board Gokuldas Shah passed away

Pune : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास शहा यांचे निधन

इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) विठ्ठलदास शहा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले.शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गोकुळदास भाई शहा यांच्या दुःखद निधनाने इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली.

गोकुळदास भाई शहा यांचा जन्म 10 ऑगस्ट 1936 रोजी झाला. तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण बाबींचे ते साक्षीदार ठरले. इंदापूर तालुक्याच्या राजकारणात तत्कालिन खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. भाऊ आणि भाई या जोडीने 1984 साली इंदापूर तालुक्यातील बिजवडीच्या माळावर वालचंदनगर येथील साखर कारखाना विकत घेऊन त्याचे सहकारात पुनर्ररोपन केले. या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या योगदानामुळे हा वटवृक्ष कायम बहरत गेला. यातुनचं तालुक्याला वैभवप्राप्ती झाली. शेतकरी वर्गाचे अर्थाजन झाल्याने भाऊ आणि भाईंची जोडी ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून नावारूपाला आली.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून तालुक्यात शिक्षणाची दारे उघडण्यात भाईंचा सिंहाचा वाटा आहे. हजारों युवकांना उच्च दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध करुन देण्यात ते यशस्वी झाले. यासोबत वडिलोपार्जित आलेला व्यापारी वसा त्यांनी तंतोतंत जपला अल्पावधीतचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक प्रसिद्ध व्यापारी म्हणून शहा कुटुंब नावारुपाला आले. यात भाईंचं मोठं योगदान आहे. या सर्व बाबींमुळेचं इंदापूर तालुक्याच्या राजकारणात भाई हे नांव कायमचं चर्चेत राहिले तालुक्यातचं नव्हे तर जिल्ह्यातही त्यांच्या नावाचा दरारा होता.

भाई यांच्या पाश्चात्त्य मुले, मुली, सुना, नातसुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांचे ते वडील होत, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा या भाईंच्या सुनबाई तर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांचे ते चुलते होते.

Web Title: Pune Indapur Former President Education Broadcasting Board Gokuldas Shah Passed Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..