Pune : इंदापूर ग्रामपंचायतच्या हद्दीतील मोरे वस्ती येथे नारळाच्या झाडावर कोसळली वीज

विजेच्या जोरदार कडकडाटासह पावसाच्या तुरळक सरी
नारळाच्या झाडावर वीज कोसळली.
नारळाच्या झाडावर वीज कोसळली.sakal

इंदापूर : इंदापूर इंदापूर शहरासह परिसराच्या भागांमध्ये शनिवार रात्री जोरदार विजेच्या कडकडाटासह पावसाने तुरळक हजेरी लावली. यावेळी शहरालगत असलेल्या माळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोरे वस्ती येथील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित व मोठी वित्तहानी झाली नाही.

इंदापूर शहरासह तालुक्याच्या काही भागात शनिवारी रात्री 9 च्या सुमारास जोरदार विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह कुठे गारांचा तर काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली. दरम्यान इंदापूर अर्बन बँकेचे संचालक बाळासाहेब मोरे राहत असलेल्या इंदापूर शहरालगत असणाऱ्या मोरे मळ्यात दारासमोरील असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे शेंड्याकडून झाड पेटले.

सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. तर शहरासह परिसरात शनिवारी रात्री अचानक आकाशात विजा कडाडून वादळी वाऱ्यासह अर्ध्या तासाच्या काळात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तर अनेक भागात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com