
Pune : इंदापूर तालुक्यातील काटी येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार (ता.07) रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान शेतात काम करीत असताना वीज कोसळल्याने ओंकार दादाराम मोहिते (वय 22 वर्षे,रा. काटी भरतवाडी ता.इंदापुर) या तरुणाचा मृत्यू झाला.
याबाबत मयताचे चुलते तुकाराम भिवा मोहिते (वय 41 वर्षे व्यवसाय शेती रा. काटी भरतवाडी ता. इंदापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (ता.07) काटी येथे दादाराम मोहिते यांच्या शेत जमिन गट नंबर 593 मध्ये चुलत पुतण्या ओंकार मोहिते मका पिकाला पाणी देण्याचे काम करीत होता यावेळी वादळी वा-यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे चुलत पुतण्या ओंकार याला घरी चल पाऊस येईल असे म्हणालो त्यावेळी पुतण्या ओंकार हा मला म्हणाला की, तुम्ही पुढे जावा, तुमच्या पाठीमागे मी घरी येतो.
त्यानंतर मी तेथुन माझे घरी आलो. तेव्हा अचानक मोठ्याने विज कडाडलेला आवाज आला त्यामुळे मी घराचे बाहेर येवुन पाहिले असता आमचे भावकीतील मनाल मोहिते याचे शेताचे बांधावर असलेल्या नारळाचे झाड पेटुन आग लागली होती.
तेव्हा मी तसेच माझी वहिनी शोभा दादाराम मोहिते, माझा चुलत भाऊ निलेश मधुकर मोहिते व आमचे भावकीतील इतर लोक पळत माझा चुलत भाऊ दादाराम मोहिते याचे शेतात जावुन पाहिले असता माझा पुतण्या ओंकार मोहिते हा त्यांचे शेतात पडला होता,
त्याचे अंगावरील टी शर्ट जळालेला दिसला त्यावेळी त्याची काहीएक हालचाल होत नव्हती. तेव्हा त्यास सर्वांनी मिळुन चारचाकी गाडीतुन औषधोपचारकामी उपजिल्हा रुग्णालय इंदापुर येथे दाखल केले असता तो औषधोपचारापुर्वीच मयंत झालेबाबत सांगितले.
यावरून इंदापूर पोलिस स्टेशनला आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सचिन बोराडे करीत आहेत.