पुणे : "इंडियन हिस्टरी काँग्रेस" परिषद निधी कमतरतेमुळे रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागाने सरकारला पाठविले आहे. मात्र, राजकीय दबावामुळे ही परिषद रद्द केल्याचे बोलले जात आहे. परिषदेच्या आयोजकांनी एक महिना नव्हे तर जवळपास 10 महिने आधी यासाठी परवानगी घेतली होती. 

‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापण्यात आलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची संस्था आहे. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाने या संस्थेची स्थापना केली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ही परिषद आयोजित करण्यात येणार होती. या परिषदेत देशभरातून सुमारे ३ हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते.

"निधीच्या कमतरता तसेच बालेवाडी येथे खेलो इंडियाच्या कार्यक्रमासाठी अधिवेशनाला येणाऱ्या एक हजार लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. यामुळे इंडियन हिस्टरी काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलल्याचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अधिकृत रित्या सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरवातीला अधिवेशन व्हावे असे पत्र हिस्टरी डिपार्टमेंट कडून देण्यात आलेले आहे, या अधिवेशनासाठी

''दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे, आतापर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही त्यामुळे आता आम्ही कुठलेही वचन देत नाही, पण निधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु"
- डॉ राधिका सेशन, इतिहास विभागप्रमुख

Web Title: Pune: "Indian History Congress" council canceled due to lack of funds