पुणे : महागाईचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे मोफत सरपण वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेतर्फे मोफत सरपण वाटप

महागाईचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे मोफत सरपण वाटप

शिवाजीनगर: महागाईचा निषेध म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना पुणे शहरच्या वतीने प्रत्येक प्रभागात आंदोलन करून शिवसैनिक रस्त्यावर उतरले.शिवसेना शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने सिलेंडर चे वाढलेले भाव याचा निषेध म्हणून गोखलेनगर, जनवाडी वस्ती भागातील पाचशे कुटुंबांना मोफत सरपण (लाकूड) वाटप करण्यात आले. "महागाई आटोक्यात आली नाही तर आपल्या देशामध्ये श्रीलंके सारखी परिस्थिती होऊ शकते" अशी भीती संयोजक उमेश वाघ यांनी व्यक्त केली.

यांनी आयोजित केलेल्या अनोख्या आंदोलनाला शहर प्रमुख गजानन थरकुडे शहर संघटिका सविता मध्ये मते गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह प्रवीण डोंगरे प्रकाश धामणे, उपेश सोनवणे,युवराज जाधव,संजय डोंगरे, संतोष ओरसे, आकाश रेणुसे, सागर जाधव,स्नेहल पाटोळे,विनोद धोत्रे , विशाल गायकवाड, भाग्यश्री सागवेकर, दिपाली शिगवण आदी उपस्थित होते.

Web Title: Pune Inflation Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top