‘पिफ’चे आजपासून आयोजन

Pune-International-Film-Festival
Pune-International-Film-Festival

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ उद्यापासून (ता. ९) सुरू होत आहे. बालगंधर्व रंगमंदिरात या महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा उद्या सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

हिंदी मालिकांचे दिग्दर्शक बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्‍ड ॲवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात येईल, तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक ॲण्ड साउंड’ देत सन्मानित करण्यात येणार आहे. 

राज्याचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन पार पडणार आहे. याबरोबरच सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेता सुबोध भावे यांचीही उपस्थिती असेल, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com