‘पिफ’मध्ये सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन - जब्बार पटेल (व्हिडिओ)

Jabbar-Patel
Jabbar-Patel

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) ९ ते १६ जानेवारी दरम्यान रंगणार आहे.

‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही या महोत्सवाची थीम आहे. राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येतील, अशी माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी दिली.

फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कॅंथोला, अभिजित रणदिवे आदी उपस्थित होते.

‘एफटीआयआय’ला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महोत्सवांतर्गत उपक्रमांचे आयोजन केले आहे. याद्वारे देशातील चित्रपट साक्षरतेचा उत्सवच साजरा केला जाईल, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.

साठ देशांमधून एक हजार ९०० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यापैकी १९१ चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. चित्रपटविषयक चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पुण्यात चार ठिकाणी आठ स्क्रीन्सवर चित्रपट पाहता येणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), आयनॉक्‍स, बंड गार्डन रस्ता आणि पीव्हीआर पॅव्हेलियन, सेनापती बापट रस्ता या चित्रपटगृहांचा समावेश आहे.

महोत्सवांतर्गत येणाऱ्या सिंहावलोकन या विभागात दिग्दर्शक व लेखक ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट दाखविण्यात येतील. इटलीतील चित्रपट निर्माते फेडरिको फेलिनी यांचेही चित्रपट दाखविले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com