गेला नाला कुणीकडे...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

उंड्री - अतिक्रमणे झाल्याने सय्यदनगर परिसरातील नाला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच काही ठिकाणी त्याचा नैसर्गिक प्रवाहाचा मार्ग बदलला आहे. त्यामुळे ‘गेला नाला कुणीकडे’ अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. 

पावसाळ्यात या नाल्याला भरपूर पाणी असते. त्यामुळे पुराचा धोका नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाचे या अतिक्रमणांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. नाल्याची पाहणी करून त्यावरील अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याची मागणी होत आहे. 

महंमदवाडी व कृष्णानगर परिसरातील चित्रही यापेक्षा वेगळे नाही. नाल्याच्या पात्रात कचरा व राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे नाल्याच्या प्रवाहाचा मार्ग बदलला आहे. पावसाळ्यात या नाल्याला पूर येतो. दोन वर्षांपूर्वी एक महिला या पुरात वाहून गेली होती. परंतु, महापालिकेने या घटनेतून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. सामाजिक कार्यकर्ते असगर बेग म्हणाले, ‘‘नाल्याच्या कडेला राडारोडा टाकून भर टाकली जात आहे. त्यानंतर या भरावावर पत्र्याच्या शेड उभारल्या जातात. हे काम वर्षानुवर्षे सुरू आहे.’’ याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सफाईचे काम अद्याप अर्धवट
महंमदवाडी, कृष्णानगर (आंबेकर मळा ) ते हडपसरपर्यंत या नाल्याच्या सफाईचे काम वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडून सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ५ जूनपर्यंत मुदत असल्याचे मुकादम गजानन लोंढे यांनी सांगितले. मात्र कामाची गती पाहता ते मुदतीत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे.

नाल्याच्या पात्रात कचरा, राडारोडा टाकला गेला आहे. यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नाल्याचे पाणी वाढून पूर येण्याच्या घटना मागील काही वर्षांत वाढल्या आहेत. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
- साजिद शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते

Web Title: Pune issue dranage