पुणे : शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चतुर्थश्रेणी कर्मचारी अपुरे; सुरक्षाव्यवस्थेतही हलगर्जीपणा
school News
school Newssakal media

पुणे: शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणा, तसेच वर्गाबाहेर विद्यार्थ्यांवर देखरेख न ठेवणे यामुळे शाळांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे वास्तव आहे. परिणामी, याचे पडसाद विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर उमटत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेबाबत पालकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.

शालेय अध्ययनाबरोबरच वर्गाबाहेर विद्यार्थी पिण्याच्या पाण्याची टाकी, स्वच्छतागृह, क्रीडांगण अशा विविध ठिकाणी वावरत असतात. अशा सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवणे, विशेषत: क्रीडांगणावर विद्यार्थी असताना त्याठिकाणी एखादा तरी शिक्षक उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र, सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

मुलींच्या सुरक्षेसाठी लवकरच धोरण

मुंबई ः शाळेमध्ये मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. शाळेत मुलींच्या सुरक्षेसाठी नवीन धोरण आणण्याची आवश्यकता आहे. याबाबत चर्चा सुरू असून लवकरच हे धोरण सभागृहासमोर आणले जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेमध्ये दिले. पुण्यामध्ये एका शाळेत मुलीवर अत्याचार घडला असल्याचे वृत एका संकेतस्थळाने दिल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्या वेळी गायकवाड यांनी त्याची दखल घेतली.

कित्येक वर्षांपासून सरकारी, अनुदानित, खासगी शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती होत नसल्याचे वास्तव आहे. अनेक खासगी, अनुदानित शाळांमध्ये एजंटांमार्फत खासगी सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित केली आहे. परंतु शाळांमध्ये गैरप्रकार घडू नयेत, म्हणून जनजागृती करण्यात येईल.

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. शाळांमध्ये महिला सुरक्षारक्षक असणे अपेक्षित आहे. विद्यार्थिनींमध्ये ‘गुड टच, बॅड टच’बाबत जागृती करणे गरजेचे आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागामार्फत कारवाई होणे अपेक्षित आहे.

- जयश्री देशपांडे, अध्यक्ष, पॅरेटस्‌ असोसिएशन पुणे

१० ते १५ वर्षे वयोगटात विद्यार्थ्यांच्या विचारांची जडणघडण होते. अशा वयात अत्याचारांनी पीडित ठरलेल्या विद्यार्थ्यांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मन दबले जाण्याची शक्यता असते. नैराश्य, चिंताग्रस्त, व्यक्तिमत्त्वाबाबत आजार मुलांमध्ये जडू शकतात.

- प्रा. चेतन दिवाण, सचिव, राज्य मानसिक आरोग्य जनजागृती समिती

लहान मुलांवरील अत्याचाराचे गुन्हे

राज्य २०१८

उत्तर प्रदेश १९ हजार ९३६

मध्य प्रदेश १८ हजार ९९२

महाराष्ट्र १८ हजार ८९२

बिहार ७ हजार ३४०

राज्य २०१९

महाराष्ट्र १९ हजार ५९२

मध्य प्रदेश १९ हजार २८

उत्तर प्रदेश १८ हजार ९४३

राजस्थान ७ हजार ३८५

राज्य २०२०

मध्य प्रदेश १७ हजार ०८

उत्तर प्रदेश १५ हजार २२७

महाराष्ट्र १४ हजार ३७७

पश्‍चिम बंगाल १० हजार २४८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com