Pune : जीवधन किल्ल्याच्या पायरी मार्गाने घेतला मोकळा श्वास घेतला

दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला हा मार्ग ऊन, वारा, पाऊस यांचा मारा खात मोकळं होण्याची वाट पाहत होता.
Pune : जीवधन किल्ल्याच्या पायरी मार्गाने घेतला मोकळा श्वास घेतला
Pune : जीवधन किल्ल्याच्या पायरी मार्गाने घेतला मोकळा श्वास घेतला sakal

जुन्नर : ऐतिहासिक नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग म्हणून ओळखल्या जाणा ऱ्या जीवधन किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या पायरी मार्गाने शेकडो वर्षांनंतर रविवारी ता.२८ रोजी मोकळा श्वास घेतला. यावेळी दुर्ग सेवकांनी भंडाऱ्यांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला हा मार्ग ऊन, वारा, पाऊस यांचा मारा खात मोकळं होण्याची वाट पाहत होता. पायरी संवर्धन कामाचा श्रीगणेशा १४ फेब्रुवारी २०२१ रोजी झाला. सलग नऊ महिन्यात सह्याद्रीचे दुर्गसेवकांनी अतोनात कष्ट घेत दिवसाची रात्र करून गाडलेला पायरी मार्ग नुकताच मोकळा केला.

सह्याद्रीचे दुर्गसेवक नोव्हेंबर महिन्यात 'स्वराज्याचे प्रवेशद्वार' या उपक्रमांतर्गत 'सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान' च्या माध्यमातून गडाला लाकडी दरवाजा बसविण्यासाठी माप घेण्यासाठी आले होते यावेळी दरवाजामध्ये असलेला दगडांचा अन मातीचा खच मोकळा केल्याशिवाय दरवाजा बसवता येणार नाही हे दिसून आल्याने त्यांनी ही मोहीम हाती घेतली होती. रविवारी ता. २८ नोव्हेंबर रोजी दगडांचा खच उचलून मोहिमेची सांगता करण्यात आली.

Pune : जीवधन किल्ल्याच्या पायरी मार्गाने घेतला मोकळा श्वास घेतला
खासदारांचं निलंबन 'स्क्रिप्टेड'; सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर घणाघाती आरोप

पायरी संवर्धन मोहीम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिवजन्मभूमी विभागाचा मोठा सहभाग आहे त्यास शिरूर तालुका, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, खेड तालुका, संगमनेर तालुका, सोलापूर जिल्हा या विभागाच्या दुर्गसेवकांनी सहभागी होत हातभार लावला. येत्या १२ डिसेंबर रोजी गडावरील कल्याण दरवाजाला लाकडी दरवाजा बसवून त्याचा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com