Pune : तीस लाखाच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी जुन्नरच्या माजी नगरसेवकास अटक

जुन्नरच्या माजी नगरसेवकासह एकाचे विरोधात सुमारे ३० लाखाची आर्थिक फसवणुक केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud news
Fraud newsesakal

जुन्नर : जुन्नरच्या माजी नगरसेवकासह एकाचे विरोधात सुमारे ३० लाखाची आर्थिक फसवणुक केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत पुनाजी कवठे, मूळ रा. कोपरे ता. जुन्नर, सध्या रा. धनकवडी पुणे यांनी माजी नगरसेवक अविन विष्णू फुलपगार व अनिल वाल्मिकी (पूर्ण नाव माहित नाही) रा.जुन्नर यांचे विरुद्ध फिर्याद दिली आहे.

यापैकी आरोपी फुलपगार यास पोलीसांनी अटक केली असून न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

सप्टेंबर १५ मध्ये फुलपगार व वाल्मिकी यांचे समवेत कवठे यांची भेट झाली. यावेळी जुन्नर मधील शिवाजीनगर येथील नुरजहा बेगम इमाम अली सय्यद याची मिळकत फुलपगार यांनी विकास करारनामा करून विकासाकरिता घेतल्याचे सांगितले. यासाठी तीस लाख रुपयांचे आर्थिक सहाय्यची मागणी केली.

बांधकामानंतर विक्री करून येणाऱ्या रकमेतून तीस लाख रुपये परत करू त्यावर ३९ लाख रुपये असे एकूण ६९ लाख रुपये देण्याचे ठरले होते. कवठे यांनी चेकने ही रक्कम दिली परंतु ठरल्याप्रमाणे एक वर्षाच्या आत ही जागा विकसित केली नसल्याचे लक्षात आल्याने पैशाची विचारणा केली असता त्यांनी आळेफाटा येथे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे देतो

असे सांगून वेळ घालवला यावेळी फुलपगार यांनी दिलेले चेक वटले नाहीत. वारंवार पैसे मागून सुद्धा ते पैसे देत नसल्याने तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com