भौतिक सुविधा म्हणजे गुणवत्ता हा समज काढून टाका 

दत्ता म्हसकर
बुधवार, 28 मार्च 2018

जुन्नर - पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती जुन्नर आयोजित तालुका स्तरीय शिक्षण परिषद व शैक्षणिक प्रबोधन मेळावा ओझर ता.जुन्नर येथे झाला. मेळाव्याचे उदघाटन मालपाणी समूहाचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांचे हस्ते झाले. यावेळी बोलताना मालपाणी म्हणाले, ''भौतिक सुविधा म्हणजे गुणवत्ता हा समज शिक्षकांनी काढून टाकावा. गुणवत्तेसाठी मनोरंजनातून गणित व व्याकरणाच्या सोप्या अभ्यास पद्धती त्यांनी सोदाहरण समजावून दिल्या पाहिजे''.

यावेळी मोहित ढमाले, जिल्हा परिषद सदस्य, जीवन शिंदे पंचायत समिती सदस्य, सतीश गाढ़वे गटविकास अधिकारी सतीश गाढवे,  सरपंच अस्मिता कवडे, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शाळांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले. तसेच  शिक्षकांनी आकर्षक शैक्षणिक साहित्य मांडणी तसेच पथनाट्य सादर केले.  

कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटशिक्षण अधिकारी के डी भुजबळ यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी अशोक लांडे यांनी मानले. 

Web Title: pune junnar dr. sanjay malpani education