Pune News: जुन्नरला मतमोजणीच्या सात फेऱ्या

वानेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी एकही अर्ज आला नाही
Political News
Political News sakal

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील निवडणुका झालेल्या १७ पैकी १४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांसाठी रविवारी ता.१८ रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवार ता.२० रोजी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.(Pune News Updates)

तहसील कार्यालयाच्या आवारातील तलाठी कार्यालय येथे एकूण सात टेबलावर सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी वीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.आंबे व हिवरे तर्फे मिन्हेर या दोन ग्रामपंचायतीची सरपंच व सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यांचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.

वानेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी एकही अर्ज आला नाही. उर्वरित चौदा ग्रामपंचायतीचे मतमोजणीचे नियोजन पुढीलप्रमाणे :- पहिली फेरी : काळवाडी, हातवीज. दुसरी फेरी : बोतार्डे, शिंदे, सुलतानपूर. तिसरी फेरी : पारगाव तर्फे आळे, काले. चौथी फेरी : झापवाडी, भिवाडेखुर्द.पाचवी फेरी : साकोरी तर्फे बेल्हे,सोमतवाडी. सहावी फेरी : विठ्ठलवाडी, अणे. सातवी फेरी : सावरगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com