जुन्नर परिसरात हनुमान जयंती उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

रोकडे मारुती मंदिरात दंड जोर व सूर्य नमस्कार स्पर्धा

दत्ता म्हसकर
जुन्नर (पुणे): जुन्नर शहर व परिसरातील हनुमान मंदिरात आज (शनिवार) पहाटे श्री जन्मोत्सव मोठया उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.

जुन्नरचे ग्रामदैवत श्री रोकडे मारुतीचे मूर्तीस सामाजिक कार्यकर्ते निलेश दुबे यांनी सपत्नीक दुग्धाभिषेक केला. यानंतर महापूजा झाली. बाबा महाराज सरजीने यांचे श्री जन्माचे कीर्तन झाले. नंतर पारंपरिक पद्धतीने श्री जन्म सोहळा साजरा करण्यात आला, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी दिली.

या निमित्ताने सकाळी दंड जोर व सूर्य नमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या त्यात सहभागी विदयार्थी तसेच प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यानंतर शिववंदना व महाआरती झाली. सायंकाळी सामुदायिक हनुमान चालीसा व हनुमान स्तोत्र पठाण झाले. मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम  नंतर महाआरती झाली.

Web Title: pune junnar haunman jayanti