esakal | पुणे : नालेसफाईचे नुसते फोटेसेशन, स्वच्छता नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

Cleaning
पुणे : नालेसफाईचे नुसते फोटेसेशन, स्वच्छता नाहीच

पुणे : नालेसफाईचे नुसते फोटेसेशन, स्वच्छता नाहीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुसळधार पावसामुळे शहराच्या पूर्व भागात हाहाकार मारला असून, अजूनही स्थिती पूर्ववत झालेली नाही. यानिमित्ताने भाजपसह सर्व पक्षिय नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामावर टीकेची झोड उठवली. नालेसफाई सुरू असताना आयुक्त, महापौर जाऊन पाहणी करतात, तेथे फोटोसेशन होते, पण त्यांनी केलेल्या सूचनांचे देखील पालन होत नाही. कोट्याकोट्यावधीचा वरधीचा खर्च केवळ दिखाऊ आहे अशी टीका मुख्यसभेत करण्यात आली.

गेल्या आठवड्यात शहरात अतिवृष्टी झाली. यात धानोरी, येरवडा, वडगाव शेरी सह इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली. मुख्यसभेला सुरवता होताच माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी हा विषय उपस्थित करून तक्रारींचा पाढा वाचला. आमदार सुनील टिंगरे, अनिल टिंगरे यांनी पूर्व भागात झालेल्या अनधिकृत बांधकाम, नाले वळविण्याचा प्रकाराकडे लक्ष वेधले.

नगरसेवक आदित्य माळवे म्हणाले, ‘‘पावसाळ्यापूर्वी पावसाळी गटार साफ करण्याची निविदा काढली जाते, आपण भेट देतो, पण प्रत्यक्षात काम होत नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत.

सचिन दोडके म्हणाले, ‘‘महापौरांनी नालेसफाईची पाहणी करून काम व्यवस्थित करण्याची सूचना केली तरीही अधिकारी ऐकत नाहीत. हा सभागृहाचा अपमान आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा.

‘नाले सफाई व्यवस्थित झाली नाही. तुम्ही आमच्या भागात येऊन बघा नागरिक तुमची चांगलीच आरती करतील अशी खोचक टीका नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांनी केली.

‘नगर रस्त्यावर आलेल्या पुराचा प्रशासनाने अहवाल तयार करावा, या भागात यंदाच प्रथमच पाणी साचले याचा अभ्यास करावा लागेल. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. या भागातील नाले कोणी वळवले, कोणी अतिक्रमणे केली, हे सुद्धा प्रशासनाने शोधून कारवाई करावी असे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सांगितले.

जास्त पावसामुळे पूर

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, "नगरसेवकांनी सांगितलेल्या ठिकाणांची पाहणी करून कार्यवाही केली जाईल. धानोरी व परिसरात ७५ मिलिमीटर पाऊस पडल्याने पावसाळी गटारातून पाणी बाहेर आले. शहरात एकूण ३६६ ठिकाणी पाणी साचते त्यापैकी आणखी १०० ठिकाणी उपाययोजना करायच्या आहेत. ड्रेनेज व पावसाळी लाइनची वहन क्षमता वाढविण्यात येणार आहे.

loading image
go to top