
भाजपसाठी नेहमीच वातावरण चांगले आहे. काँग्रेसने केवळ घोषणाबाजी केली, पण काम केले नाही.
Udayanraje Bhosale : पायाभूत सुविधांच्या कामामुळे भाजपचा विजय निश्चीत
पुणे - भाजपसाठी नेहमीच वातावरण चांगले आहे. काँग्रेसने केवळ घोषणाबाजी केली, पण काम केले नाही. पुणे शहरात भाजपने पायाभूत सुविधांची भरपूर कामे केली त्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा विजय पक्का आहे, अशा विश्वास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
भाजप महायुतीचे उमेदवार रासने यांच्या प्रचारार्थ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज सायंकाळी रोड शो केला. दत्तवाडीतील म्हसोबा चौक येथून या रॅलीला सुरवात होऊन सेनादत्ता पोलिस चौकी, गांजवे चौक, नवी पेठ विठ्ठल मंदिर, हत्ती गणपती, भावे हायस्कूल, माती गणपती, मोती बाग, शनिवार वाडा, शिवाजी रस्ता, माणिक चौक यामार्गे येऊन लाल महाल येथे समारोप झाला.
माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले,‘‘कसब्याच्या प्रचारात भाजपचे मोठे नेते येत असले तरी ते नेते रासने यांच्या प्रेमाखातर येत आहे. विरोधक काही टीका करत असले तरी कोणाला निवडून आणायचे जनता ठरवते.
कोणी आले तरी महायुतीच जिंकणार अशी टीका अजित पवार यांनी केली. त्यावर'‘अजित पवार मोठा माणूस आहे. त्यांना दृष्टांत झाला असेल ते भविष्य सांगत आहेत. पण मी वर्तमानात जगतो, असो. मी वर्तमानात आहेत,’’ असा टोला उदयनराजे भोसले यांनी मारला.