पुण्यातील कात्रज चौकातील कोंडी फुटणार; उड्डाणपुलासाठी केंद्राकडून १६९.१५ कोटी मंजूर 

katraj flyover
katraj flyover

धायरी : कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्र सरकारने १६९.१५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले असून हा उड्डाणपूल झाल्यास येथील वाहतूक कोंडी फुटण्याबरोबरच बाहेरील गाड्या सरळ निघून जाण्याने पुणे शहराकडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यासही मदत होणार आहे, असे म्हटले आहे. दै. 'सकाळ' मधूनही येथील अपघात आणि वाहतूक कोंडीबाबत अनेक वेळा आवाज उठवण्यात आला होता. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी (वडगाव-कात्रज-कोंढवा-मंतरवाडी चौक-लोणी काळभोर-थेऊर फाटा ते लोणीकंद रस्ता) या रस्त्यावर कात्रज येथे सहापदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल
खासदार सुप्रिया सुळे या हा पूल आणि वडगाव ते कात्रज तसेच कात्रज ते कोंढवा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या. अनेक वेळा नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन देण्याबरोबरच संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला अपेक्षित यश आले असून लवकरच कात्रज चौकात सहा पदरी उड्डाणपूल उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या उड्डाणपुलासाठी १६९.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आपण हा पूल आणि रस्ता रुंदीकरणासाठी गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असून संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात देखील या रस्त्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर केला याबद्दल रस्ते वाहतूक मंत्री नीतीनजी गडकरी यांचे मनापासून आभार, असे त्यांनी म्हटले आहे. 

पाटस-बारामती-इंदापूर जत रस्त्यासाठी १०.३७ कोटी मंजूर
कात्रज येथील उड्डाणपुलाबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जी पाटस-बारामती-इंदापूर-अकलूज-सांगोला-जत या मार्गाच्या दुरुस्तीसाठीही केंद्र सरकारने १०.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com