पुणे : कात्रज चौकात नित्याचीच वाहतूक कोंडी.! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune katraj chowk traffic jam

पुणे : कात्रज चौकात नित्याचीच वाहतूक कोंडी.!

कात्रज : कात्रज चौकातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. नेहमीच चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येते. यामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी तर अधिकची भर पडत असते. दोनशे मीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी मोजावा लागतो. कोंढवा रस्ता, सातारा रस्ता, नवले पूल आणि पुणे शहरातून एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यात पावसामुळे चौकातील सिग्नल व्यवस्था बंद पडल्याने गोंधळात आणखीनच भर पडत आहे. भारती विद्यापीठ पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी त्याला यश येत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

शहरातून सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कर्नाटक, गोवा राज्यात जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणांत रहदारी असते. त्यातच चौकात चालू असलेले उड्डाणपुलाचे काम, सकाळच्या वेळी कामाला जाण्यांसाठी चाकरमान्यांची गडबड यामुळे वाहतूक कोंडी होण्यात अधिक भर पडते. कोंढव्याकडून मुंबईकडे आणि नवलेपुलांकडून कोंढवामार्गे सोलापूर रस्त्यांवर निघणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणांवर असते.

त्यातच सातारा रस्त्याला जाताना दोनवेळा सिग्नलचा अडथळा वाहनचालकांना पार करावा लागत असून पुढे बॉटलनेकसारखी स्थिती असल्याने वाहने कोंडीत अडकतात. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने समन्वय साधत यावर तोडगा काढून वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सकाळी कामाला जाण्याच्या वेळी तर चौकात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे घरातून किमान एक तास अगोदर निघावे लागते. कारण चौकातील वाहतूक कोंडीचा कधीही अंदाज येत नाही. - अदित्य गायकवाड, वाहनचालक

पावसांमुळे अनेकवेळा चौकातील सिग्नल बंद होतात. अवजड वाहने कशाही पद्धतीने उभी केलेली असतात. अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. प्रशासनाने यावर तोडगा काढायला हवा.

- गणेश खाटपे, स्थानिक नागरिक

पावसामुळे सिग्नल बंद पडल्यास वाहतूकीचा बोजवारा उडतो. पंरतु, याठिकाणी वाहतूक कोंडी न होता ती संथ होते. तसेच वाहतूक पोलिसही त्यांचे कर्तव्य चोख बजावतात. काही ठिकाणी पालिका प्रशासनाशी समन्वय साधून कारवाई करून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

- अनिल शेवाळे, पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक

Web Title: Pune Katraj Chowk Traffic Jam Due To Rain Traffic Department Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..