Pune : नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल परिसरात पुन्हा एकदा अपघात

मंगळवारी पहाटे दरी पुलावर ट्रेलर पलटी होऊन अपघात
pune
pune sakal

पुणे : नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल यादरम्यानच्या अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भरधाव ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले. हि घटना मंगळवारी पहाटे पावणे चार वाजता जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी जखमी जवानांना तत्काळ बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला.

मंगळवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास सातारा येथून निघालेला मोठा ट्रेलर ट्रक (एम एच ४६ - २९५०)पुण्याला येत होता. जांभूळवाडी येथील दरी पुलाजवळ भरधाव ट्रक आल्यानंतर पलटी झाला. याबाबतची माहिती मुख्य अग्निशामक दलाच्या नियंत्रण विभागाला मिळाली. त्यानुसार, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेल्या ट्रकच्या केबिनमधे सीटवर चालक जखमी अवस्थेत अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाशी संवाद साधत त्याला धीर दिला. त्यानंतर जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर या उपकरणाच्या मदतीने आणि एका क्रेनच्या साह्याने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढले.त्यानंतर त्यास तत्काळ उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

घाबरलेल्या दुचाकीस्वाराने मारली तलावात उडी!

दरम्यान, पलटी झालेला ट्रेलर पाहत एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात होता.त्याने प्रत्यक्ष हा अपघात पाहिल्याने तो मदतीसाठी पुढे आला..मात्र ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेत असल्याचे पाहताच दुचाकीस्वाराने घाबरुन स्वतचा वाचण्याकरिता दरीपुलावरुन खाली तलावात उडी मारली. जवान तेथे दाखल झाल्यानंतर काही वेळाने मदतीसाठी त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास ही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले.अपघाताचे नेमके कारण व दोन्ही जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दुर केला आहे.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल शिवाजी मुजूमले, फायरमन शिवाजी आटोळे, मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी तसेच "पीएमआरडीए" अग्निशमन दल यांचे जवान, पोलिस व स्थानिक नागरिकांनी जखमींना मदतीचा हात दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com