‘महाआयटी आयडॉल’मध्ये पुण्याचा कौस्तुभ तिसरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पुणे - शहरातील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील कौस्तुभ देवकर याने ‘महाआयटी आयडॉल’ या राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम विजेत्यांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. या वर्षी मुंबई येथील सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील हेतल शहा या विद्यार्थ्याने प्रथम, तर अहमदनगरच्या रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आशिष ढासे याने द्वितीय क्रमांक पटकावला.

‘सीड इन्फोटेक’ या संस्थेतर्फे गेल्या वर्षापासून दरवर्षी राज्य स्तरावर ‘सीड आयटी आयडॉल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये अभियांत्रिकी व इतर शाखांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भाग घेतात. विद्यार्थ्यांमधील सी प्रोग्रॅमिंग आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान चाचपून त्यांना आयटी क्षेत्रात येण्यासाठी आवश्‍यक कौशल्यांची जाणीव करून देणे, तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना तयार करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख हेतू आहे. यंदा या स्पर्धेचे आठवे वर्ष असून, राज्याच्या ३३६ महाविद्यालयांतील ७३ हजार विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. या स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रॅंड येथे आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक विभागात अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले १० स्पर्धक यात सहभागी झाले होते.

Web Title: Pune kaustubh in the third mahaayati Idol