खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, 11 दरवाजे पावणेदोन फुटांनी उघडले!

pune khadakwasla dam water level updates
pune khadakwasla dam water level updates

खडकवासला (पुणे Pune) : खडकवासला धरण साखळीत आज शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. खडकवासला धरणातील येवा 17 हजार क्यूसेकपेक्षा जास्त होता. म्हणून शनिवारी रात्री 16 हजार 247 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढविणार असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आज संध्याकाळी पाच वाजता चार ही धरणात मिळून सुमारे 80 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील शनिवार आठ ऑगस्ट रोजी या चार धरणात मिळून 57.96 टक्के पाणीसाठा होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आठ दिवसांत आठ टीएमसीची वाढ
आज चार ही धरणात मिळून 23.19 टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील शनिवार आठ ऑगस्ट रोजी या चार धरणात मिळून 16.89 टीएमसी होते. अशा 5.950 टीएमसी पाणी वाढले तर बुधवार पासून धरणात विसर्ग सुरू केला आहे. आज अखेर दोन टीएमसी पाणी मुठा नदीत सोडून उजनी धरणात जमा होते. अशा प्रकारे आठ टीएमसी पाणी जमा झाले. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सकाळ शी बोलताना सांगितले. 

शनिवारी रात्री आठ वाजता 11 दरवाजे सुमारे पाऊणे दोन फुटाने उघडले असून त्यातून 16 हजार 247 क्यूसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता सुमारे 14 हजार क्यूसेकचा येवा होता. शनिवारी सकाळ 11 वाजेपर्यंत कायम होता. अकरा वाजता 11 हजार 207 क्यूसेक पर्यत कमी केला. परंतु, दुपारनंतर पाऊस वाढल्याने संध्याकाळी साडे अकरा क्यूसेक चा सुमारे 17 हजार क्यूसेक येवा येत आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मागील अकरा तासात खडकवासला 25,पानशेत 61, वरसगाव 60, टेमघर येथे 50 मिलिमीटर पाऊस झाला होता. दरम्यान, पुलावरून पाणी जात असल्याने उत्तमनगर पोलिसांनी पहाटे मुठा नदीवरील शिवणे- नांदेड पूल वाहतुकीस बंद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com