
पुणे : सीमा भिंत कोसळून एकाचा मृत्यू
कोथरूड : रामबाग काॅलनी मधील मैत्री इमारती जवळ महानगरपालिकेने बांधलेली सीमा भिंत कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला. करण वली, वय 26 असे त्याचे नाव आहे. जयभवानी मंदिराकडे जाणा-या रस्त्यालगत उभारलेली भिंत कोसळली. त्यामध्ये करण वली हे गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या वली यांना ससूनला हलवण्यात आले. तेथे चारच्या सुमारास वली यांचे निधन झाले.
घटनास्थळी उपस्थित असलेले जय हनुमान ट्रस्टचे नवनाथ खिलारे म्हणाले की, गप्पा मारत बसलेल्या वली यांच्या अंगावर भिंत कोसळली. या कामाची चौकशी करावी. भिंतीचे काम दर्जाहीन असल्यामुळेच ही दुर्घटना घडली. वली हे या भागात वाॅचमन म्हणून काम करत होते. त्यांच्यामागे पत्नी व दोन लहान मुले आहेत.
दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. मजुराचे उपचाराचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जावा. याभागातील भिंतीचा काही भाग यापूर्वीही ढासळला होता. येथे होणा-या अनाधिकृत बांधकामांबात वारंवार तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. ही भिंत सुध्दा चुकीची बांधल्याने पडली आहे.
Web Title: Pune Killed Border Wall Collapses
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..