पुणे-कोल्हापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मार्गी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

पुणे - अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-मिरज-कोल्हापूर या लाेहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मार्गी लागणार असून यासाठी  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ५१३ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. हे काम पॉवरग्रीड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येणार आहे. 

पुणे मिरज-लोंढा दरम्यान दुहेरी रेल्वेमार्ग करण्याच्या कामाचा प्रारंभ गेल्याच महिन्यात झाला. पाठोपाठ पुणे-मिरज-कोल्हापूर या मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली आहे. पुणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जातो. पुणे-मिरज-लोंढा-होस्पेट-गुंटकल मार्गे बंगळूर आणि चेन्नईला काही रेल्वे गाड्या जातात. या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या गाड्या विनाअडथळा जातील.

Web Title: pune-kolhapur electric railwayline