फी भरली नाही म्हणून परिक्षेस बसू दिले नाही; पालकांची शाळेकडून सहकार्याची अपेक्षा

फी भरली नाही म्हणून परिक्षेस बसू दिले नाही; पालकांची शाळेकडून सहकार्याची अपेक्षा

कोथरुड : शालेय फीची थकीत रक्कम भरल्याशिवाय आपले पाल्य कोणत्याही प्रकारच्या पेपर तपासणीकरिता पात्र राहणार नाही याची नोंद घ्यावी, अशी सुचना पालकांना दिल्यानंतरही ज्यांनी फी भरली नाही अशा पालकांच्या पाल्यांना ऑनलाईन परिक्षेची संधी नाकारण्यात आल्याची घटना कोथरुडमध्ये घडली. मित्राने परीक्षा दिली मी का नाही देवू शकत असे रडवल्या चेह-याने विचारणा-या मुलांना काय उत्तर द्यायचे? या विचाराने भावनिक झालेल्या पालकांनी सकाळकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोरोना महामारीमुळे संसार मेटाकुटीला आला आहे. रोजच्या जगण्याची लढाई सुरु असताना मुलांची शिक्षणाची इच्छा पुरी करु शकत नसल्याची खंत वाटत आहे. शिक्षण संस्थांनी फी साठी तगादा लावला आहे. फी भरु शकलो नाही म्हणून मुलाला परीक्षेस बसू दिले नाही. मुलामध्ये नाकारलेपणाची भावना निर्माण झाली आहे. आता आम्ही काय करावे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

फी भरली नाही म्हणून परिक्षेस बसू दिले नाही; पालकांची शाळेकडून सहकार्याची अपेक्षा
'सोन्या' म्हटल्याच्या रागातून बुलेट चालकासह 2 महिलांना मारहाण; हडपसरमधील घटना

सागर जाधव हे पालक म्हणाले की, शाळेची फी ३१ हजार पाचशे रुपये आहे. पैकी वीस हजार रुपये भरले आहेत. उर्वरीत पण भरणार आहोत. पण आता पैसेच नाहीत उधारही कोणी देत नाही. त्यामुळे संस्थेने सहकार्य करावे अशी अपेक्षा होती. एक महिला पालक म्हणाल्या की, मी एकल पालक आहे. माझ्या मुलीला खुप शिकवायची इच्छा आहे. परंतु आता कोरोनामुळे मी सुध्दा हतबल झाले आहे. त्यातच फी नाही म्हणून मुलीला परिक्षेस बसू दिले नाही. यासर्व घटनेमुळे मला निराश वाटत आहे.

महेश विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष सचिन मंत्री म्हणाले की, १५ टक्के पालकांनी फी भरलेली नाही. ३५ टक्के पालकांनी निम्मी फी भरली आहे. शाळेकडे सुमारे पंचावन्न टक्के फी जमा झाली आहे. २१ मे ला आम्ही पुन्हा ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत. त्यावेळी ज्यांनी फी भरली असेल अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. मुख्याध्यापिका अश्विनी मुजुमदार म्हणाल्या की, पालकांना दहा टप्प्यात फी भरायची सुध्दा संधी दिली होती. वर्ष संपलेय तरी सुध्दा अनेकांची फी आलेली नाही. या परीक्षेचा मुलांच्या शिक्षणावर काहीही परीणाम होणार नाही. फी भरल्यावर या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com