गुलटेकडी मार्केट यार्डात तोबा गर्दी! भाजीपाला, फळांचे वाढले भाव

Pune Large crowd in Gultekdi Market Yard
Pune Large crowd in Gultekdi Market Yard

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी भाजीपाला, फळे खरेदीसाठी मोठी गर्दी उसळलेली आहे. दहा दिवस लॉकडाऊन आहे. या काळात भाजीपाला, फळे मिळणार नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.

हवेलीकरांसाठी २५० बेड उपलब्ध होणार अन्...

बाजारात भाजीपाला, फळे यांचे ७० ते १०० टक्क्यांनी भाव वाढले आहेत. कोरोनाच्या येण्या आधी नियमित मार्केट यार्ड सुरू असताना ही इतकी गर्दी मार्केटमध्ये होत नव्हती. त्यापेक्षा जास्त गर्दी आज असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले. 


सोशल डिस्टन्सिंग नाहीच !
गर्दी झाल्याने बाजारात कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. तसेच सॅनिटाटझरचा वापर केला जात नाही. ग्राहकांचे तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर बाजार समितीने सुरू केला होता. तोही सध्या बंद आहे. शिवनेरी पथ रस्त्यावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी आहे. बाजार समिती कर्मचारी सकाळपासून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी करत आहेत. परंतु गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांची ही दमछाक झाली आहे. या रस्त्यावर एवढी मोठी वाहतूक कोंडी होऊन ही वाहतूक पोलीस कुठे ही दिसले नाहीत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


Edited by : Sharayu Kakade

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com