esakal | Pune : शीव रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : शीव रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : अत्यंत दुरवस्था झालेल्या व वर्षानुवर्षे काम रखडलेल्या खडकवासला आणि किरकटवाडी या दोन गावांच्या अनुक्रमे कोल्हेवाडी व शिवनगर या भागांसाठी एकमेव पर्याय असलेल्या शिव रस्त्याच्या कामाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे ८७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आतातरी चांगला मार्ग तयार होईल, या आशेवर नागरिक आहेत.

खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शिवरस्त्याला लागून सध्या सुमारे दहा ते पंधरा हजार नागरिकांची वस्ती आहे. मोठमोठ्या इमारती या रस्त्याच्या आधारे मंजुरी घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र स्थानिकांचा विरोध व राजकीय आणि प्रशासकीय अनास्था अशा कारणांमुळे एवढी मोठी लोकवस्ती वर्षानुवर्षे चांगल्या रस्त्याच्या प्रतिक्षेत आहे. यापूर्वीही दोन ते तीन वेळा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले, मात्र काम पूर्ण झाले नाही.

त्यामुळे आता तरी हा शिवरस्ता किमान चालण्यायोग्य व्हावा, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, नगरसेविका अश्विनी पोकळे, सरपंच सौरभ मते, गोकूळ करंजावणे, काजल हगवणे, बबिता चव्हाण, विजय कोल्हे, कालिदास चावट, महादेव मते, विजय मते, शेखर हगवणे, किरण हगवणे, अशोक मते, दिगंबर कोल्हे, भाऊसाहेब हगवणे, सुनील हगवणे, रूपेश घुले, सचिन मोरे, तेजस हुलावळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: खानवडीतील मुलींची शाळा कागदावरच

ड्रेनेज किंवा पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने डोंगरावरून वाहत येणारे पाणी अरुंद गल्ल्यांमध्ये शिरते. लोकांच्या घरातही पाणी शिरत आहे. नियोजनपूर्वक रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे.

- शंकर मते, ज्येष्ठ नागरिक, शिवनगर किरकटवाडी

केवळ उद्‍घाटन करून दिखावा करून उपयोग नाही. अशी उद्‍घाटने अनेक वेळा झाली आहेत. केवळ निधीची जाहिरात केली जाते, प्रत्यक्ष काम पूर्ण होते की नाही, हेही पदाधिकाऱ्यांनी पाहावे. ड्रेनेज लाइन, पावसाळी गटार यांचे नियोजन न केल्यास ‘मनसे’चा या कामाला विरोध असणार आहे.

- विजय मते, मनसे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष

सध्या सातशे मीटर लांबीचे काम प्रस्तावित आहे. ज्या ठिकाणी अगोदर काम झालेले आहे, तेथे एक थर व जेथे काम झालेले नाही तेथे दोन थर टाकून काम करण्यात येणार आहे. ड्रेनेज लाइन किंवा पावसाचे पाणी जाण्याची व्यवस्था हे या नियोजनात नाही.

- चेतन शिंदे, शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

loading image
go to top