पुणे : एक लाख थकबाकीदारांवर ‘महावितरण’कडून कारवाई

शहरातील ३५ हजार ग्राहकांचा समावेश
महावितरण विजजोडणी
महावितरण विजजोडणीsakal

पुणे : थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पुणे परिमंडलातील ९५ हजार १२७ ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून अंधारातच आहेत. यामध्ये सर्वाधिक ७६ हजार १३ घरगुती ग्राहक असून, पुणे शहरातील ३५ हजार ग्राहकांचा समावेश आहे.

Sakal

कोरोना प्रादुर्भावामुळे पुण्याबाहेर गेलेल्या व तेथूनच ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे नोकरी करणाऱ्या ग्राहकांमुळे, भाडेकरू नसल्याने बंद घर किंवा इतर कारणांमुळे वीजवापर नसल्याने अनेक घरगुती ग्राहकांनी थकबाकी भरली नसल्याचे महावितरणच्या पाहणीत दिसून आले आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित केल्यानंतर घरात कोणी राहत नाही किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे वीजवापर नसला तरी बिलांची थकबाकी ठेवू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Sakal

महावितरणकडून सध्या शून्य ते ३० युनिट वीजवापर होणाऱ्या वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्यांच्या पर्यवेक्षणासाठी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसा व सायंकाळनंतर विशेष तपासणी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com