परिमंडळ महावितरण
परिमंडळ महावितरणsakal

पुणे : वीजग्राहकांकडे ६०४ कोटींची थकबाकी

१७ लाख ३६ हजार २५० वीजग्राहकांकडे ६०४ कोटी ७६ लाखांची थकबाकी आहे.

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील १७ लाख ३६ हजार २५० वीजग्राहकांकडे ६०४ कोटी ७६ लाखांची थकबाकी आहे. या थकबाकीची वसुली सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. ३०) व रविवारी (ता. ३१) सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे.

परिमंडळ महावितरण
पुणे : 3300 फूट उंच सुळक्यावर घेतले झोके

पुणे प्रादेशिक विभागातील लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे थकबाकी पुढीलप्रमाणे ः (कंसात थकबाकीदार ग्राहकांची संख्या) पुणे जिल्हा (८,६७,२००)– ३५९ कोटी २१ लाख, सातारा (१,६०,७९०)– २८ कोटी १६ लाख, सोलापूर (२,६०,४१५)– ८२ कोटी ४ लाख, सांगली (१,९९,२४०)– ५३ कोटी ६८ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (२,४८,५९५)- ८१ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

परिमंडळ महावितरण
इंदापूर : पहिल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेत १२३ विषयांना मंजुरी

चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच, लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करता यावा, यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच, मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संबंधित वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात आला आहे, असेही महावितरणने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com