
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
Police Recruitment : पोलिस वाहनचालक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
पुणे - पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना २६ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित उमेदवारांनी मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर येथील महा-आयटी विभागाकडून लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. लेखी परीक्षेसाठी येताना सोबत हे प्रवेशपत्र, वाहनचालक परवाना, आधार कार्ड किंवा अन्य कोणतेही शासकीय ओळखपत्र आणि काळ्या रंगाच्या बॉलपेन असावी. लेखी परीक्षा २६ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे. परंतु दोन तास अगोदर म्हणजे सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास पवार यांनी केले आहे.