लोहगाव विमानतळावर गोंधळ घालणारी प्रवासी तरुणी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

लोहगाव विमानतळावर गोंधळ घालून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत अंगठ्याचा चावा घेणाऱ्या प्रवासी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime : लोहगाव विमानतळावर गोंधळ घालणारी प्रवासी तरुणी अटकेत

पुणे - लोहगाव विमानतळावर गोंधळ घालून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत अंगठ्याचा चावा घेणाऱ्या प्रवासी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. गुंजन राजेशकुमार अग्रवाल (वय २४, रा. हावडा, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील निरीक्षक रूपाली ठोके (वय ३९) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शनिवारी (ता.११) रात्री सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजन ही टॅक्सीने लोहगाव विमानतळ येथे आली होती. तिने टॅक्सीचे पैसे न दिल्याने चालकाने विमानतळ विभागाशी संपर्क केला.

यावेळी टर्मिनल मॅनेजर महिला तेथे आली. तिच्याशी गुंजन हिने वाद घातला. त्यादरम्यान तक्रारदार या विचारपूस करण्यासाठी गेल्यानंतर गुंजन हिने त्यांच्याशीही वाद घालत प्रवासी रांगेत गोंधळ घातला. यावेळी फिर्यादी ठोके आणि विमानतळ व्यवस्थापक लुल्ला यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुंजनला अटक करण्यात आली.