
पुणे : लोहगाव-वाघोली रस्त्यावर अतिक्रमण कारवाई
लोहगाव : लोहगाव-वाघोली मुख्य रस्त्यावरील जुन्या महापालिका हद्दीत पालिकेने केलेल्या कारवाईत सुमारे २७ हजार ९८६ चौरस फूट अनधिकृत बांधकामे व पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आली.
महिनाभरा पूर्वी याच रस्त्यावर नवीन पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे, शेड, दुकानांवर कारवाई झाली होती. मात्र जुन्या हद्दीत कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. महापालिकेच्या वतीने जुन्या हद्दीतील सर्व दुकानदार, अनधिकृत बांधकामाना नोटीसा देऊन मुख्य रस्त्यापासून पन्नास फूट आतमध्ये दुकाने, शेड घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये गॅरेज, दुकाने, फर्निचर मॉल अशा १५ पत्र्याच्या शेडवर कारवाई करण्यात आली.
पालिकेचे झोन क्रमांक चारचे अधिक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, कनिष्ठ अभियंता फारुख पटेल, कश्यप वानखेडे यासह स्थानिक पोलीस, अतिक्रमण विभागाकडील पोलीस कर्मचाऱ्यांनी बिगारी, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई पार पाडली.
Web Title: Pune Lohgaon Wagholi Road Encroachment Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..