लोहगाव विमानतळावरील कोंडी फुटली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

- प्रवाशांची रोजची ये-जा - सुमारे 22 हजार प्रवासी 
- विमानांची वाहतूक - रोज सुमारे 200 
- खासगी, प्रवासी वाहनांची ये-जा - रोज सुमारे 5 हजार 

पुणे  वाहनांच्या गर्दीने गजबजलेल्या लोहगाव विमानतळाची मंगळवारी (ता. 5) कोंडीतून सुटका झाली. कारण नव्या पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी आता सुरू झाली. त्यामुळे किमान पहिल्या दिवशी तरी प्रवाशांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते. 

लोहगाव विमानतळावर या पूर्वी ओला- उबर, टॅक्‍सी स्टॅंड आवारातच होता. त्यातच ड्रॉप आणि पिक अपसाठी वाहनांची गर्दी असे. त्या गर्दीतून वाट काढून आपल्या वाहनापर्यंत पोचणे प्रवाशांना जिकिरीचे जात होते. या पार्श्‍वभूमीवर आता नव्या पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत ओला उबर, प्री पेड रिक्षा, टॅक्‍सी यांना आता विमानतळासमोरील पार्किंग क्रमांक दोनमध्ये हलविले आहे. तर, पार्किंग क्रमांक एकमध्ये खासगी वाहने आणि दुचाक्‍या उभ्या करण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना ड्रॉप करण्यासाठी चालकांना तीन मिनिटांचा वेळ दिला आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास त्या चालकाकडून 340 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर प्रवाशांच्या पिकअपसाठीही तीन मिनिटे दिली आहेत. मात्र, प्रवाशांना पिकअप करण्यासाठी व्यावसायिक प्रवासी वाहनांना 50 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. 

पार्किंगच्या नव्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शेड उभारण्याचे काम सुरू असल्याचे मंगळवारी दिसून आले. तसेच पहिल्या दिवशी तरी वाहनांच्या गर्दीतून विमानतळाची सुटका झालेली दिसून आले. 

- प्रवाशांची रोजची ये-जा - सुमारे 22 हजार प्रवासी 
- विमानांची वाहतूक - रोज सुमारे 200 
- खासगी, प्रवासी वाहनांची ये-जा - रोज सुमारे 5 हजार 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune Lohugaon airport traffic issue sloved