Pune: बोट उलटून घडलेल्या घटनेत खंडाळ्यात वाचले आठ जणांचे प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचले आठ जणांचे प्राण

पुणे : बोट उलटून घडलेल्या घटनेत खंडाळ्यात वाचले आठ जणांचे प्राण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या खंडाळा तलावात नौकानयन करताना बोट उलटली. सुदैवाने स्थानिक तरुणांनी सतर्कता दाखवत पाण्यात उड्या घेतल्याने लहान बालकांसह आठ जणांचे जीव वाचले. आज दुपारी ही घटना घडली. खंडाळा तलावात लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने नौकानयन सुरू करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

आज रविवारची सुटी असल्याने खंडाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास काही पर्यटक खंडाळा तलावात बोटीतून सैर करत होते. त्यावेळी बोट अचानक कलंडली. लहान बालक, महिलेसह या बोटीत आठ प्रवासी होते. बोट उलटल्याने ते सर्व जण पाण्यात पडले.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

स्थानिक तरुण नागेश माडे, अविनाश दिवाकर, विशाल राजभर, अरुण राजभर, अजिंक्य कुमार, मुकेश नेटम आदींनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या टाकत पर्यटकांना वाचवले. खंडाळा नौकानयन केंद्र नव्याने सुरू झाले असून, या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी, लाईफ गार्ड, सुरक्षिततेची साधने तैनात करण्याची गरज पर्यटकांनी व्यक्त केली.

loading image
go to top