लोणावळ्याच्या दोन लोकल  एक महिन्यासाठी रद्द 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

पुणे-लोणावळा लोहमार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान या मार्गावरील दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 

पुणे - पुणे-लोणावळा लोहमार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान या मार्गावरील दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून रोज दुपारी एक वाजता लोणावळ्यासाठी सुटणारी लोकल (99818) रद्द करण्यात आली आहे. तसेच लोणावळ्याहून दुपारी दोन वाजता पुण्याकडे येणारी लोकल (99813) एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Lonavla local canceled for one month