पुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा ब्लॅक स्पॉट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आढळले आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर सर्वाधिक संवेदनशील आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात झालेल्या ५४०पैकी सर्वाधिक ७० टक्‍के म्हणजे सुमारे ४३२ अपघात याच मार्गावर झाले आहेत.

रेल्वे स्थानकांजवळील पादचारी पुलांऐवजी थेट लोहमार्ग ओलांडणे, हेडफोन घालून लोहमार्गावरून चालणे यामुळे सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी लोहमार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने बॅरिकेड्‌स लावले आहेत. काही ठिकाणी भिंती उभारल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हे आहेत ब्लॅक स्पॉट
पिंपरी - दोन्ही प्लॅटफॉर्मची बाजू, मुंबईकडील बाजूस पुलापुलाजवळ व पुण्याकडील बाजूस प्लॅटफॉर्मजवळील नाला. तेथून प्रवासी लोहमार्गावर येतात.

चिंचवड स्टेशन - पादचारी पुलाऐवजी सर्रासपणे लोहमार्ग ओलांडून जाणे. 

आकुर्डी - एका महाविद्यालयाजवळील पायवाट. लोणावळ्याहून येणारे प्रवासी येथे धावत्या गाडीतून उतरतात. प्लॅटफॉर्म संपल्यानंतर अनेक जण लोहमार्ग ओलांडतात. 

कासारवाडी - स्टेशनजवळ वाहनांसाठी पूल आहे. त्याखालून प्रवासी प्लॅटफॉर्मवर ये-जा करतात.

दापोडी - येथील स्थानक आणि फाटकादरम्यान लोहमार्गाच्या कडेने प्रवासी येतात. 

खडकी - येथील सर्व्हिस स्टेशनजवळून प्रवासी लोहमार्ग ओलांडतात.

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील अपघातांकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने पाहत असून, उपाययोजना सुरू केल्या आहेत. लोहमार्ग ओलांडणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई केली जात आहे.
- मिलिंद देऊस्कर, व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

Web Title: pune lonawala railway track black spot