Pune : जारकरवाडीतील शेतकऱ्याचा मुलगा अक्षय लांभाते बनला वन परिक्षेत्र अधिकारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०२१ मध्ये राज्यात १६ वा क्रमांक मिळविला
अक्षय बाळू लांभाते
अक्षय बाळू लांभाते sakal

पारगाव : जारकरवाडी आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अक्षय बाळू लांभाते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०२१ मध्ये राज्यात १६ वा क्रमांक मिळविला असुन त्याची वन परिक्षेत्र अधिकारी पदी निवड झाली आहे.

अक्षय बाळू लांभाते याचे प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळा जारकरवाडी येथे झाले त्याने येथीलच आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीला ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला अकरावीत असताना वडिलांचे अकाली निधन झाले.

तो एकुलता एक असल्याने पितृछत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली आईला आधार देत त्याने जिद्दीने अभ्यास करत महात्मा गांधी विद्यालय (मंचर ) येथे त्याने बारावीला ८० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय आला पुढे पुणे येथील पी.व्ही.जी. कॉलेजमधून प्रिंटींग इंजिनिअरिंग पदवी संपादन केली त्यानंतर मुंबई या ठिकाणी प्रिंटींग क्षेत्रातील खाजगी कंपनीत कार्यरत असताना

अक्षय बाळू लांभाते
Pune News: गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झालेत अन् पुण्यात भावी खासदार म्हणुन ‘या’ नेत्याचे झळकले बॅनर्स

त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली अडीच वर्ष नोकरी केल्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन पुर्णवेळ अभ्यास करून पहिल्याचा प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल जारकरवाडीच्या माजी सरपंच रुपाली भोजणे व भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी संचालक उद्योजक रमेश लबडे यांनी अभिनंदन केले आहे.

अक्षय बाळू लांभाते
BJP Pune: भाजपचे भावी खासदार ठरले? बापट यांना जाऊन तीन दिवस झाले नाहीत, तोच बॅनरबाजी; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com